Mumbai: कोरोनानंतर आता डेंग्यू मलेरियाचे थैमान, आठवड्याभरात रुग्ण संख्या दुप्पट

मुंबई, कोरोना रुग्णांची संख्या (Mumbai Corona Update)  कमी झाली असली तरी पावसाळी आजारांनी मात्र डोकं वर काढले आहे. गेल्या एकाच आठवड्यात साथीच्या रोगांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली वाढल्याने नागरिकांसोबतच प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.  गेल्या आठवड्यात मलेरिया रुग्णांची (Dengue Malaria patient in mumbai)   संख्या 119, गॅस्ट्रो 176, डेंग्यू 19, लेप्टो 5 तर स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या […]

Mumbai: कोरोनानंतर आता डेंग्यू मलेरियाचे थैमान, आठवड्याभरात रुग्ण संख्या दुप्पट
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 9:13 AM

मुंबई, कोरोना रुग्णांची संख्या (Mumbai Corona Update)  कमी झाली असली तरी पावसाळी आजारांनी मात्र डोकं वर काढले आहे. गेल्या एकाच आठवड्यात साथीच्या रोगांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली वाढल्याने नागरिकांसोबतच प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.  गेल्या आठवड्यात मलेरिया रुग्णांची (Dengue Malaria patient in mumbai)   संख्या 119, गॅस्ट्रो 176, डेंग्यू 19, लेप्टो 5 तर स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या 3 इतकी होती. या आजारांची संख्या आता मलेरिया 243, गॅस्ट्रो 340, डेंग्यू 33, लेप्टो 11 आणि स्वाइन फ्लू 19 इतकी वाढली आहे. जुलैच्या सुरुवातीपासूनच मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर पावसाळी आजारही वेगाने वाढत आहेत. पाणी साचून राहत असल्यामुळे कीटकांचा वाढलेला प्रादुर्भाव आणि दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. यामध्ये दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, कावीळ असे आजार होतात. तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

रुग्णसंख्येची दुपटी

मुंबईत संपूर्ण जूनमध्ये मलेरियाचे एकूण 350 रुग्ण होते. मात्र जुलेमध्ये 19 तारखेपर्यंत रुग्णांचा आकडा 243 वर पोहोचला आहे. तर संपूर्ण महिन्यात डेंग्यूचे 39 रुग्ण आढळले होते. आता या रुग्णांची संख्या 33 वर पोहोचल्ग्री आहे. स्वाइन फ्लूचे 2 रुग्ण आढळले होते. या रुग्णांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे.

पालिकेची यंत्रणा सज्ज

पावसाळी आजारांचा कंट्रोल रूमच्या माध्यमातून दररोज आढावा घेण्यात येत असून कार्यवाही करण्यात येत आहे. घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असून जनजागृती करण्यात येत आहे. पावसाळी आजारांसाठी दीड हजार बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. पावसाळी आजार रोखण्यासाठी घरोघरी औषधे, गोळ्यांचे वाटप, तपासणीही करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

पाण्याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक

पावसाळ्याच्या दिवसात बऱ्याच ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा होतो. आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी गाळून आणि उकळून पाणी वापरावे असे आवाहन दरवर्षी केडीएमसीकडून केले जाते. पावसाच्या संततधारेमुळे धरण, तसेच नद्यांमधील पाणी गढूळ होण्याची दाट शक्यता असते. त्यावर मनपाच्या जल केंद्रात प्रक्रिया करून, पिण्यायोग्य पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविले जाते, परंतु त्यानंतरही प्रक्रिया केलेले पाणी काही प्रमाणात गढूळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वैद्यकीय आरोग्य प्रशासनाकडून पाणी गाळून, उकळून पिण्याकडे सातत्याने लक्ष वेधले जाते.

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.