Mumbai Corona Update: मुंबईत 24 तासात कोरोनाचे 322 नवीन रुग्ण, 16 जुलैनंतर अधिक रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे 11 लाख 24 हजार 813 रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यापैकी 19 हजार 651 जणांचा मृत्यू झाला आहे.

Mumbai Corona Update: मुंबईत 24 तासात कोरोनाचे 322 नवीन रुग्ण, 16 जुलैनंतर अधिक रुग्णांची नोंद
मुंबईत 24 तासात कोरोनाचे 322 नवीन रुग्ण, 16 जुलैनंतर अधिक रुग्णांची नोंदImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 1:44 PM

मुंबई – मुंबईत (Mumbai) मागच्या 24 तासांत कोरोनाचा (Corona) संसर्ग झालेले 322 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला. आता मुंबईत कोरोना रुग्णांची रुग्णांची संख्या 1901 वर पोहोचली आहे. म्हणजेच शहरात 1901 पीडीत रुग्णांवरती कोरोनाचे उपचार सुरू आहेत. मोठी गोष्ट म्हणजे मुंबईत 16 जुलैनंतर प्रथमच नवीन रुग्णांची संख्या 300 च्या पुढे गेली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी सापडले होते. तसेच कोरोनाची चर्चा देखील थांबली होती. सध्या कोरोना रुग्णांची सख्या वाढत असल्याने सरकारची पुन्हा डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाने (Health Department) काळजी घेण्याचे आवाहन सरकारला केले आहे.

आतापर्यंत 19 हजार 651 लोकांचा मृत्यू झाला आहे

मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे 11 लाख 24 हजार 813 रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यापैकी 19 हजार 651 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात शहरात 236 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर शहरात बरे झालेल्यांची संख्या 11 लाख 3 हजार 261 झाली आहे. रुग्णांचे बरे होण्याची टक्केवारी 98 टक्के आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचे 1849 नवीन रुग्ण

रविवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1,849 नवीन प्रकरणे नोंद झाली आहे. साथीच्या आजारामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 80,47,455 झाली असून मृतांची संख्या 1,48,104 वर पोहोचली आहे, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईत संसर्गाचे 322 नवीन रुग्ण आढळले आहेत. ते म्हणाले की, सध्या राज्यात कोविडचे 13,003 रुग्ण उपचार घेत आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की प्रयोगशाळांमध्ये बीए.5 प्रकारच्या विषाणूची 52 प्रकरणे आणि बीए.4 प्रकारची 10 प्रकरणे आढळून आली आहेत. त्यामुळे मुंबईत आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. त्याचबरोबर सरकारने देखील काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झाल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला होता. परंतु आता पुन्हा आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढणार आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.