AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, दोन दिवस पडलेल्या पावसाने केली मोठी कमाल

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणक्षेत्रात सातत्याने पाऊस सुरु आहे.

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, दोन दिवस पडलेल्या पावसाने केली मोठी कमाल
| Updated on: Jul 09, 2024 | 3:48 PM
Share

Mumbai Dam Water Level : मुंबईसह उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्यासाठ्यात घट झाल्याने संपूर्ण शहरात 10 टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत बहुतांश ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागत आहे. पण रविवारपासून मुंबईत सुरु असलेल्या पावसाने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

सप्टेंबरपर्यंतच्या पाण्याची चिंता मिटली

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग यांसह कोकण किनारपट्टीवर रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मुंबईत सोमवारी 71 हजार 147 दशलक्ष लीटर पाणीसाठा नोंदवण्यात आला. मुंबईतील सातही धरणात एकूण 20.48 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या पाणीसाठ्याची चिंता मिटल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

धरणक्षेत्रात दमदार पाऊस

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणक्षेत्रात सातत्याने पाऊस सुरु आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या सातही धरणांमध्ये 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. यातून रोज 3 हजार दशलक्ष पाणीपुरववठा केला जातो. गेल्या दोन दिवसांपासून या धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

गेल्या 24 तासात विहार धरणक्षेत्रात 364 मिमी आणि तुळशी धरणक्षेत्रात 254 मिमी पाऊस पडला. मुंबईतील पवई तलावही काल ओव्हरफ्लो झाला. पण या धरणातील पाणी औद्योगिक वापरासाठी वापरले जातो. तर मोडक सागर धरणात 35.85 टक्के पाणीसाठा आहे. तानसा धरणात 40.61 टक्के, मध्य वैतरणा धरणात 19.51 टक्के, भातसा धरणात 16.13 टक्के पाणीसाठा, विहार धरणात 31.74 टक्के, तुळशी धरणात 45.51 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांची सप्टेंबरपर्यंतची पाण्याची चिंता मिटल्याचे मुंबई महापालिकेने सांगितले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मागील तीन दिवसात जवळपास १० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठी 20.48 टक्के इतका शिल्लक आहे.

Follow Us
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत