Mumbai Rains Live | मुंबई-ठाण्यात पावसाचा जोर, दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

Mumbai Rains Live | मुंबई-ठाण्यात पावसाचा जोर, दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन आपत्कालीन विभागाने केलं (Mumbai Heavy Rain Alert) आहे.

Namrata Patil

| Edited By: अनिश बेंद्रे

Aug 04, 2020 | 9:58 AM

मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विविध भागात रात्रीपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावली. मुंबईतील वरळी, धारावी, दादर, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, अंधेरी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तसेच पुढील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पालिकेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. (Mumbai Heavy Rain Alert)

Mumbai Rain Live Updates

[svt-event title=”गोरेगावमध्ये नागरिकांच्या घरात पाणी” date=”04/08/2020,9:46AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

9.30 am – ठाणे : घोडबंदर रोडवरील ओवळा हनुमान मंदिर परिसरात रस्त्यावरील इलेक्ट्रिक खांबाचा शॉक लागून एकाचा मृत्यू 

9.15 am – दादर-प्रभादेवी भागात पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वांद्रे ते चर्चगेट दरम्यानची वाहतूक बंद, केवळ विरार-अंधेरी-वांद्रे लोकल वाहतूक सुरु

[svt-event title=”चेंबूरमधील रस्त्याला नदीचे स्वरुप” date=”04/08/2020,8:58AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

मुंबई लोकल : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सूचना

पश्चिम रेल्वे – पूर्णपणे ठप्प

हार्बर रेल्वे – कुर्ला ते सीएसएमटी बंद

मध्य रेल्वे – धीम्या गतीने

मुंबईत वरळी, धारावी, दादर, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, अंधेरी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला.  कुर्ला – नेहरूनगर, भायखळा, गोरेगाव, किंग सर्कल, करी रोड, कांदिवली, चारकोप परिसरातील सखल भागात पाणी भरल्याचे पाहायला मिळत आहे. गोरेगावमध्ये मोतीलाल नगरात रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं.

नवी मुंबईत पहाटेपासून पावसाने रौद्र रुप धारण केले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील वाशी, एपीएमसी, माफको मार्केट, ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे, नेरुळ या भागात रस्त्यावर पाणी साचलं आहे. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

मुंबईतील पावसाची आकडेवारी (पहाटे सहा वाजेपर्यंत)

मुंबई शहर – 230.06 मिमी

मुंबई पूर्व उपनगर – 162.83 मिमी

मुंबई पश्चिम उपनगर – 162.28 मिमी

पाहा व्हिडिओ :

अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी आज बंद ठेवण्याचे पालिकेचे आवाहन

मुंबईसह उपनगरात आज (4 ऑगस्ट) आणि उद्या (5 ऑगस्ट) अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्र किनारे आणि किनाऱ्यालगत जाणे नागरिकाने टाळावे. तसेच एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यास त्या ठिकाणीही जाणे टाळावे, अशा सूचना मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागामार्फत मुंबई शहर आणि उपनगरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन आपत्कालीन विभागाने केले आहे. तसेच पालिकेने काही यंत्रणाही तैनात केल्या आहेत.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

 • विभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना ‘High Alert’ देण्यात आला आहे.
 • सर्व विभागीय नियंत्रण कक्षांना आवश्यक मनुष्यबळ साधनसामुग्रीसह सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 • पर्जन्य जलवाहिन्या विभागाची 6 उदंचन केंद्रे व 299 ठिकाणी बसविण्यात आलेले तात्पुरते पाण्याचा उपसा करणारे संच कार्यान्वित रहातील याची खातरजमा करण्यास सांगण्यात आले असून याकरिता आवश्यक त्या डिझेलची व्यवस्था करण्याचे निर्देश स्थानिक उदंचन संच चालकांना देण्यात आले आहेत.
 • अग्निशमन दलास त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह 6 प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवण्यास सांगण्यात आली आहेत.
 • राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या 3 तुकड्यांना अणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 • भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिका-यांना कुलाबा वेधशाळेचा अंदाज सांगण्यात आला असून मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 • बेस्‍ट (बीईएसटी) (वाहतूक व विद्युत) आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन ‘High Alert’ वर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्यांची मदत पथके तत्पर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
 • मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व कार्यतप्‍त्‍र आहे.
 • अणीबाणी मदत यंत्रणांपैकी पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते यांच्या समन्वय अधिका-यांना मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित रहाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 • मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त, एल विभाग यांना देण्यात आल्या आहेत.
 • शिक्षण अधिकारी यांना महापालिकेच्या 24 विभागांमधील तात्पुरते निवारे म्हणून निश्चित करण्यात आलेल्या महापालिका शाळा त्वरि‍त मदतीकरिता उघडून ठेवण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाद्वारे देण्‍यात आले आहेत. (Mumbai Heavy Rain Alert)

संबंधित बातम्या : 

देशात कोरोना लशीच्या वैद्यकीय चाचणीचा दुसरा आणि तिसरा टप्पा सुरु, DGCI कडून परवानगी

खासदार नवनीत राणांच्या कुटुंबातील दहा जणांना कोरोना, मुलांनाही संसर्ग, सासू-सासऱ्यांवर नागपूरमध्ये उपचार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें