मुसळधार पावसामुळे भांडुपमधील जलशुद्धीकरण संकुलातील यंत्रणा बंद, पाणी उकळून पिण्याचे आवाहन  

मात्र हा पाणीपुरवठा झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मुसळधार पावसामुळे भांडुपमधील जलशुद्धीकरण संकुलातील यंत्रणा बंद, पाणी उकळून पिण्याचे आवाहन  
tap water-supply
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 3:38 PM

मुंबई : भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली. या कारणाने मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश भागांमध्ये आज (18 जुलै 2021) होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. दरम्यान, या संकुलातील जलशुद्धीकरण यंत्रणा सुरु करून मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र हा पाणीपुरवठा झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

बहुतांश परिसरात पाणीपुरवठा बाधित 

मुंबई महानगर क्षेत्रात काल रात्रीपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. भांडुप परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे, भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये पावसाचे पाणी शिरले. या कारणाने तांत्रिक समस्या उद्भवली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा देखील खंडित करावा लागला. भांडुप संकुलातील या समस्येमुळे मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश परिसराला आज होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने शहर आणि पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. पूर्व उपनगरांमध्ये देखील अंशतः पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू

भांडुप जलशुद्धीकरण संकुलात शिरलेले पावसाचे पाणी तातडीने उपसून गाळणी (filtration) आणि उदंचन (pumping) यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात येत आहे. संबंधित संयंत्राची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती केली जात आहे. आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

पाणी उकळून पिण्याचे आवाहन

संकुलातील पेयजल उदंचन यंत्रणा काही तासातच पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र गाळणी यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

पाणीपुरवठा बाधित होऊन झालेल्या गैरसोयीबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगिरी व्यक्त करत आहे. मुंबईकर नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे

(Mumbai Heavy rains shut down water purification system in Bhandup appeal for boiled water)

संबंधित बातम्या : 

आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस बरसला, 2 तासाच्या पावसाने वसई-विरार-नालासोपाऱ्यात हाहा:कार उडवला!

मुंबई दुर्घटनांमधील मृत्यूंबद्दल अजित पवारांकडून दु:ख व्यक्त, सतर्क राहून समन्वयाने काम करण्याचे निर्देश

मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळीत दुर्घटना, मुख्यमंत्र्यांकडून शोक, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.