AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंब्रा लोकल अपघातील चार जखमींवर 16 डॉक्टरांची टीम करणार शस्त्रक्रिया, पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद

Mumbra Train Accident: मुंब्रा लोकल अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १३ जण जखमी झाले आहेत. जखमी असलेल्या चार रुग्णांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे.

मुंब्रा लोकल अपघातील चार जखमींवर 16 डॉक्टरांची टीम करणार शस्त्रक्रिया, पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 10, 2025 | 8:37 AM
Share

Mumbra Train Accident: मुंबईतील मुंब्रा लोकल अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १३ जण जखमी झाले आहेत. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. कळवा रुग्णालयात असलेल्या सात जखमींपैकी चार जखमींवर आज शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी 16 डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून मिळत आहे. अपघातातील उर्वरित जखमींना सूज आली आहे. ती सूज उतरल्यानंतर त्यांच्यावर देखील शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

मुंब्रा लोकल अपघातात 13 जण जखमी झाले आहे. त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमी कळवा छत्रपती शिवाजी महाराज, ठाणे सिविल रुग्णालय आणि ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत आहेत. अपघातात जखमी असलेल्या चार रुग्णांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. मुंब्रातील दुर्घटनेत ठाणे जीआरपीतील जवान विकी मुख्यादल यांचा मृत्यू झाला आहे. त्याचा ७ जून रोजीच वाढदिवस झाला होता. आता १७ जून रोजी मुलाचाही वाढदिवस साजरा करणार होते. परंतु त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

मुंबई कोस्टल रोडवर जेवढे प्रवासी प्रवास करत नाही, तेवढे प्रवाशी रेल्वेतून करतात. मग रेल्वेचे महत्त्वाचे प्रकल्प सोडून इतर प्रकल्प तुम्ही कसे पूर्ण करतात? असा प्रश्न रेल्वे संघटनेकडून विचारण्यात आला आहे. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात मध्य रेल्वेने मुंब्रा फास्टट्रॅक वळण रस्त्यावर रेल्वेचा वेग कमी केल्याचे चित्र दिसून येत आहे. कल्याण ते सीएसटीच्या दिशेने धावणाऱ्या मध्य रेल्वे सोमवारी ज्या वेगवान धावत होती, मात्र आता सध्या तरी या वळण रस्त्यावरती कमी वेगात धावताना दिसत आहे.

पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद

मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हा अपघात कसा झाला? यासाठी पोलिसाचा तपास सुरु आहे. लवकरच त्या लोकल ट्रेनमधील प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचा जबाब घेणार असल्याची पोलीस सूत्रांनी सांगितले. तसेच दोन रेल्वे रुळांमधील आंतर मोजण्यात येणार आहे.

मनसेकडून आज मोर्चा

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या विरोधात मनसेच्या वतीने रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आज धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाण्यातील गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानक सकाळी नऊ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. मनसे नेते अविनाश जाधवसह ठाणेकर रेल्वे प्रवासी देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. मनसेने दिवा सीएसटी लोकल सुरु करण्याची मागणी केली आहे.

Follow Us
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन