मुंबईची लाईफ लाईन पूर्वपदावर

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत संततधार पाऊस सुरु होता. पावसामुळे मुंबईसह उपनगरातील अनेक विभागात पाणी साचलं होते. त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसाचा फटका मुंबईच्या लोकल रेल्वे सेवेलाही बसला होता.

मुंबईची लाईफ लाईन पूर्वपदावर

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंईतील मुसळधार पावसामुळे ठप्प झालेली लोकल रेल्वे सेवा पूर्वपदावर झाली आहे. सीएसएमटीवरुन सकाळी पहिली लोकल 6.55 च्या सुमारास सीएसएमटी ते कसारा या मार्गासाठी सोडण्यात आली. यानंतर कल्याण ते टिटवाळा, टिटवाळा ते कल्याण आणि आसनगाव ते सीएसएमटी लोकल सुरु करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील रेल्वे सध्या धीम्या गतीने धावत आहेत.

मध्य रेल्वेकडून कल्याण ते कर्जत आणि टिटवाळा ते कसारा वगळता मध्य रेल्वेची वाहतूक सुरुळीत सुरु आहे. तसेच पश्चिम रेल्वेची वाहतूकही सुरळीत सुरु आहे. त्यामुळे आज (5 ऑगस्ट) चाकरमन्यांचे हाल होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हार्बर मार्गावरही सीएसएमटी ते पनवेल तसेच सीएसएमटी ते गोरेगाव लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे.

सकाळी मध्य रेल्वे वरुन सीएसएमटी ते अंबरनाथ रेल्वेसेवाही सुरु करण्यात आली आहे. 8.16 च्या सुमारास अंबरनाथसाठी रेल्वे सोडण्यात आली आहे. तर कल्याण ते अंबरनाथसाठी सकाळी 8.30 च्या सुमारास लोकल सोडली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत संततधार पाऊस सुरु होता. पावसामुळे मुंबईसह उपनगरातील अनेक विभागात पाणी साचलं होते. त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसाचा फटका मुंबईच्या लोकल रेल्वे सेवेलाही बसला होता. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेच्या अनेक ट्रॅकवर पाणी साचलं होते. पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प झाली होती. मात्र हळूहळू आता मुंबईची लोकल सेवा पूर्वपदावर येत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI