मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना, तिघांचा मृत्यू

या घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर काही मजूर गंभीर जखमी झाले आहेत. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना, तिघांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 2:44 PM

मुंबईतील दिंडोशीमधील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर काही मजूर गंभीर जखमी झाले आहेत. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. तसेच पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम या ठिकाणी असलेल्या गोविंद नगर भागात अनेक इमारतींचे बांधकाम सुरु आहे. यातील बांधकाम सुरु असलेल्या नवजीवन इमारतीचा स्लॅब आज दुपारी १२.३० च्या सुमारास कोसळला. ही इमारत झोपडपट्टी पुनर्वसनातंर्गत बांधली जात आहे. ही इमारत Gr + 20 अशा स्वरुपाची आहे. या इमारतीच्या 20 व्या मजल्याचे काम सुरु होते. या 20 व्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरु असताना अचानक हा स्लॅब कोसळला.

नवजीवन इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 4 कामगार जखमी झाले आहेत. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एका कामगारावर मालाडमधील देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून हा स्लॅब हटवला जात आहे. तर दुसरीकडे पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून ते या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

नवी मुंबईतील स्लॅब कोसळला

दरम्यान काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईतील कोपरखैराणे या ठिकाणच्या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला होता. या इमारतीत 70 कुटुंब वास्तव्यास होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या या इमारतीतील रहिवाशांना मदत शिबीरात पर्यायी व्यवस्था देण्यात आली आहे.

विक्रोळीत स्लॅब कोसळून तीन जणांचा मृत्यू

तर दुसरीकडे विक्रोळी पश्चिम भागातील टाटा पॉवर हाऊसजवळील कैलास बिझनेस पार्कमधील पाच मजली बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला होता. यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये 10 वर्षातील एका लहान मुलाचा समावेश होता. नागेश रामचंद्र रेड्डी (38) आणि रोहित रेड्डी (10) अशी मृतांची नावे होती.

एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.