महापौर किशोरी पेडणेकरांकडून अचानक ‘या’ पंचतारांकित हॉटेलची पाहणी, लसीकरणातील नियम उल्लंघनाच्या चौकशीचे आदेश

एकीकडे सर्वसामान्यांना लसींचा तुटवडा असल्याचं दिसतंय आणि दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी पंचतारांकीत हॉटेल ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी थेट लसीकरणाचं पॅकेज देत आहेत.

महापौर किशोरी पेडणेकरांकडून अचानक 'या' पंचतारांकित हॉटेलची पाहणी, लसीकरणातील नियम उल्लंघनाच्या चौकशीचे आदेश


मुंबई : एकीकडे सर्वसामान्यांना लसींचा तुटवडा असल्याचं दिसतंय आणि दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी पंचतारांकीत हॉटेल ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी थेट लसीकरणाचं पॅकेज देत आहेत. अशातच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अशाच एका पंचतारांकित हॉटेलात भेट देऊन तेथील लसीकरणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी हॉटेलकडून पॅकेज म्हणून जेथे लस दिली जाते त्या केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांना नियमांचं उल्लंघन होत असल्याचं लक्षात आलं. यावर त्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिला आहेत (Mumbai Mayor Kishori Pednekar order to probe in Five star Hotel vaccination package).

महापौर किशोरी पेडणेकर यांना समाजमाध्यमातून मुंबईतील “द ललित” या पंचतारांकित हॉटेलमध्ये लसीकरण होत असल्याचं समजलं. यानंतर किशोरी पेडणेकर यांनी आज (30 मे 2021) आकस्मिक पाहणी केली. या पाहणी दरम्यान लस ठेवण्यासाठी असलेल्या शीत पेट्याचे व्यवस्थित परिरक्षण होत नसल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. याबाबत महापौरांनी हॉटेलच्या व्यवस्थापकांना जाब विचारला. तसेच लस सुरक्षिततेबाबत हॉटेल प्रशासन गंभीर नसल्याचं सांगितलं. या ठिकाणी सर्व नियमांचे उल्लंघन करून नागरिकांना कोविड लस दिली जात असल्याचं निदर्शनास आल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी द ललित या पंचतारांकित हॉटेलच्या चौकशीचे आदेश दिले.

हॉटेलकडून कोणत्या नियमांचं उल्लंघन?

मुंबईतील काही हॉटेल ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी हॉटेल पॅकेजमधून कोविड लस देत आहेत. याची समाजमाध्यमातून जाहिरातही होत आहे. त्यामुळेच किशोरी पेडणेकर यांनी चौकशी करण्यासाठी थेट ‘द ललित’ हॉटेलला भेट दिली. या पाहणीत अनेक गोष्टी समोर आल्या. ‘ललित हॉटेलमध्ये कोल्ड चेन मेन्टेन केली जात नव्हती. घरगुती वापराच्या फ्रीजमध्ये कोविड लसींचा साठा करण्यात आला होता. आईस बॅग म्हणून पाण्याच्या बाटल्यांचा वापर केला जात होता. त्यामुळं ‘द ललित’मध्ये झालेल्या लसीकरणाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

महापौर पेडणेकर यांनी या प्रकाराबाबत हॉटेलच्या व्यवस्थापकांना जाब विचारला. ललित’मध्ये क्रिटीकेअर रुग्णालयाच्या माध्यमातून लस दिली जात आहे. मात्र, येथील लस साठवणीच्या पद्धतीबाबत साशंकता आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाणार आहे. क्रिटीकेअर रुग्णालयाचीही चौकशी केली जाणार असल्याचं महापौरांनी सांगितलं.

हेही वाचा :

गरीबांनी मरावं, श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा; नाना पटोलेंचा घणाघात

केंद्र सरकारचे 2 निर्णय चांगले, 4 निर्णय अतिशय वाईट, मोदींनी विश्वास गमावला; अरविंद सावंतांची टीका

मोठी बातमी: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा, नागपुरातील तरुणाचा खोडसाळपणा

व्हिडीओ पाहा :

Mumbai Mayor Kishori Pednekar order to probe in Five star Hotel vaccination package

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI