Kishori Pednekar | मुंबई महापौरांची कोरोनावर मात, लवकरच डिस्चार्ज

दहा दिवसांपूर्वी 10 सप्टेंबरला किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी स्वत: याबाबत ट्वीट करत माहिती दिली होती.

Kishori Pednekar | मुंबई महापौरांची कोरोनावर मात, लवकरच डिस्चार्ज

मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनावर मात केली आहे (Mayor Kishori Pednekar Recover From Corona). त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना आज किंवा उद्या रुग्णालयातूवन डिस्चार्ज देण्यात येईल (Mayor Kishori Pednekar Recover From Corona).

कोरोनाची लागण झाल्याने किशोरी पेडणेकरांवर सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरु होते. आता त्यांना आज किंवा उद्या डिस्चार्ज देण्यात येईल. त्यानंतर त्यांना पुढील 14 दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

दहा दिवसांपूर्वी 10 सप्टेंबरला किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी स्वत: याबाबत ट्वीट करत माहिती दिली होती.

किशोरी पेडणेकर या लॉकडाऊनपासून अनेक उपाययोजना करताना दिसत आहेत. स्वत: रस्त्यावर उतरुन त्या कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष भेटी, कोव्हिड सेंटरमध्ये जाऊन पाहणी, गणवेश परिधान करुन नर्सना प्रोत्साहन, अशा विविध रुपात किशोरी पेडणेकर पाहायला मिळाल्या.

यापूर्वीही किशोरी पेडणेकर यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. किशोरी पेडणेकर या ग्राऊंडवर असल्याने, त्यांचा लोकांशी संपर्क येत असतो. इतके दिवस कोरोनाचा मुकाबला केल्यानंतर, 10 सप्टेंबरला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला (Mayor Kishori Pednekar Recover From Corona).

किशोरी पेडणेकर यांना जून महिन्यात सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ताप आल्याने तपासणीसाठी त्या रुग्णालयात गेल्या असताना उपचारासाठी त्यांना अ‍ॅडमिट करण्यात आले. मात्र, काही दिवसातच प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला होता.

किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊन आणि कोरोना काळात मुंबईतील अनेक रुग्णालये आणि हॉटस्पॉट्सना भेटी दिल्या. कोरोना काळात त्यांनी ग्राऊंडवर उतरुन आरोग्य कर्मचारी आणि कोव्हिड योद्ध्यांचं मनोबल वाढवण्याचं काम केलं.

पेडणेकर यांनी केईएम, नायर, शताब्दी यासारख्या रुग्णालयांना भेटी दिल्या होत्या. इतकंच नाही तर किशोरी पेडणेकर यांनी स्वत: नर्सचा गणवेष परिधान करुन नायर रुग्णालयात जात तिथल्या कर्मचाऱ्यांचा हुरुपही वाढवला होता.

Mayor Kishori Pednekar Recover From Corona

संबंधित बातम्या :

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सैफी रुग्णालयात, सकाळपासून ताप आल्याने तपासणी

मुंबईच्या महापौर झाल्या कोविड योद्धा, किशोरी पेडणेकर पुन्हा नर्सच्या भूमिकेत

Published On - 3:44 pm, Sun, 20 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI