आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विलगीकरण, महापौरांकडून हॉटेलची पाहणी

आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या विलगीकरणासाठी अंधेरीतील एका हॉटेलची महापौरांनी पाहणी केली. (Kishori Pednekar Visit Five Star Hotel)

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विलगीकरण, महापौरांकडून हॉटेलची पाहणी
किशोरी पेडणेकर
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 7:33 PM

मुंबई : राज्यातील कोरोना संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. नुकतंच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पंचतारंकित हॉटेलची आकस्मिक पाहणी केली. आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या विलगीकरणासाठी अंधेरीतील एका हॉटेलची महापौरांनी पाहणी केली. (Mumbai Mayor Kishori Pednekar Visit Five Star Hotel)

यावेळी आखाती आणि इतर देशांमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विलगीकरणासाठी पंचातारंकित हॉटेलची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या हॉटेलच्या पाहणीदरम्यान संबंधित आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एक स्वतंत्र मजला आरक्षित करण्यात आला आहे, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

तसेच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रवाशांशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही. या प्रवाशांसाठी हॉटेलमधील स्वतंत्र कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे. यात कर्मचाऱ्यांमार्फतच या प्रवाशांना सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत, असेही महापौर यावेळी म्हणाल्या.

Kishori Pednekar Visit Five Star Hotel १

किशोरी पेडणेकर

तसेच यासाठी कार्यरत असलेल्या या सर्व कर्मचाऱ्यांची वेळोवेळी कोविड चाचणी सुद्धा करण्यात येत आहे. हॉटेल प्रशासनाची ही चांगली बाब पाहणीदरम्यान निर्दशनास आली आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी या ठिकाणी होत असल्याचे महापौरांनी सांगितले.

संबंधित विभागातील दोन डॉक्टर या सर्व हॉटेलसोबत समन्वय ठेवत आहेत. या सर्वच हॉटेलमध्ये या प्रकारची अंमलबजावणी होते की नाही? याकडे लक्ष देण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी संबंधित डॉक्टरांना दिले आहेत.

मुंबईकरांसाठी काळजी केंद्र, महापौर पेडणेकरांचं मिशन झिरो

दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी स्वतःच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. यापुढे कुठल्याच सार्वजनिक कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय महापौर पेडणेकर यांनी घेतला.  कोरोनाचं नव्याने वाढलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सोशल डिस्टन्सिंगसाठी महापौरांनी हे पाऊल उचललं. इतकंच नाही तर 1 मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येईल, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

दरम्यान, आता गृह विलगीकरणात कुणाला न ठेवत आता आम्ही सर्वांना काळजी केंद्रात ठेवणार आहोत. तसंच परदेशातून येणारे आणि पळून जाणाऱ्या नागरिकांवर आम्ही गुन्हा दाखल केला जाणार आहे, असं महापौरांनी सांगितलं. (Mumbai Mayor Kishori Pednekar Visit Five Star Hotel)

संबंधित बातम्या : 

1 मार्चपासून नगरसेवकांना लस, स्वत:च्या कार्यक्रमांवर बंदी, मुंबईकरांसाठी काळजी केंद्र, महापौर पेडणेकरांचं मिशन झिरो

कल्याण डोंबिवलीत कोरोना फोफावला, आयुक्त अ‌ॅक्शन मोडमध्ये, रस्त्यावर उतरुन पाहणी!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.