1 मार्चपासून नगरसेवकांना लस, स्वत:च्या कार्यक्रमांवर बंदी, मुंबईकरांसाठी काळजी केंद्र, महापौर पेडणेकरांचं मिशन झिरो

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी आजपासून स्वतःच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे.

1 मार्चपासून नगरसेवकांना लस, स्वत:च्या कार्यक्रमांवर बंदी, मुंबईकरांसाठी काळजी केंद्र, महापौर पेडणेकरांचं मिशन झिरो
किशोरी पेडणेकर, महापौर
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 2:33 PM

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी आजपासून स्वतःच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. यापुढे कुठल्याच सार्वजनिक कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय महापौर पेडणेकर यांनी घेतला.  कोरोनाचं नव्याने वाढलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सोशल डिस्टन्सिंगसाठी महापौरांनी हे पाऊल उचललं. इतकंच नाही तर 1 मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. (Mumbai Mayor Kishori Pednekar mission zero  talks on corona mumbai lockdown)

मागील काही दिवस महापौर पेडणेकर या रस्त्यावर उतरुन मास्क न लावणाऱ्या मुंबईकरांना झापत होत्या. फेरीवाले, विक्रेते यासह सर्वसामान्य नागरिकांनाही त्यांनी मास्क लावण्यास बजावलं होतं. आता मुंबई महापालिकेचे मार्शल्स लोकल रेल्वेतही फिरत आहेत. मास्क न लावणाऱ्यांना दंड ठोठावला जात आहे. याबाबत महापौर म्हणाल्या, “रेल्वेत फिरणाऱ्या मार्शल यांना मुंबई महापालिकेकडून पास दिला जाणार आहे. लग्न आणि समारंभावर लक्ष केंद्रित करणार आहे. आता लक्षणविरहित पॉझिटिव्ह रुग्णाला शिक्के मारले जातील”

जे आमचे महापालिकेचे शिक्षक आतापर्यंत घरी होते त्यांना आता आम्ही बोलावणार आहोत. त्यांना आम्ही 24 केंद्रांवर काम देणार. खेळाच्या मैदानावर पण खूप गर्दी होते. मास्क घालून लोकांना खेळता येईल. बगीच्यात बसता येईल. पुन्हा एकदा आम्ही जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करणार आहोत. आरोग्य कॅम्प आणि फिरत्या मोबाईल व्हॅन यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्ण तपासणार आहोत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

काळजी केंद्र

दरम्यान, आता गृह विलगीकरणात कुणाला न ठेवत आता आम्ही सर्वांना काळजी केंद्रात ठेवणार आहोत. तसंच परदेशातून येणारे आणि पळून जाणाऱ्या नागरिकांवर आम्ही गुन्हा दाखल केला आहे, असं महापौरांनी सांगितलं.

अशीच परिस्थिती राहिली तर लॉकडाऊन

अशीच कोरोना रुग्णसंख्या वाढत राहिली तर आपल्याला लॉकडाऊनला सामोरं जावं लागू शकतं. पण लोक आता स्वतः ठरवतील की त्यांना काय करायचं आहे, असंही पेडणेकरांनी नमूद केलं.

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

दोन तीन दिवस स्वतः आम्ही भेटी देतोय , आज सेवन हिल्स मध्ये ६९३ रुग्ण दाखल आहेत. 1 तारखेपासून रुग्ण वाढतायत , चिंताजनक बाब आहे. काल आयुक्तांसोबत बैठक झाली. त्यांनी मार्गदर्शन केलं. लग्न, बारसे , पार्ट्या झाल्या तरी ५० च्या वर लोक एकत्र नको , त्यावेळी सगळे नियम पाळले पाहिजेत

मी स्वतः सार्वजनिक कार्यक्रमांवर सध्या बहिष्कार टाकतेय , शासकीय , महापालिकेचे कार्यक्रम वगळता खासगी कार्यक्रम सध्या बंद करतेय. आम्ही सगळ्यांवर लक्ष ठेवणार आहोत. मार्शल जवान हायर करतोय ,3०० ते 3००० च्या आसपास ते असतील.

एका इमारतीत ५ रुग्ण आढल्यास इमारत सील करणार , होम क्वारंटाईनचे शिक्के देणार. रेल्वेतून मार्शल आमचे फिरतील , आणि लक्ष ठेवतील , मार्शलला आपण तिकीट देतोय

उपहारगृहात आसन व्यवस्थेत पूर्वी एका मेजावर २ लोक बसू शकत होते , १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी होती , पण नियम पाळणं बंधनकार आहे.

लक्षणे नसलेल्या रुग्णांनी फिरू नये म्हणून प्रयत्न करतोय. बऱ्याच परिसरात नोटिसा दिल्या आहेत ,

शिक्षकांना आमच्या आम्ही कामाला बोलावणार  आहोत, त्यांना आम्ही जी २४ प्रभागात वॉर रूम उभारले आहेत , तिथे त्यांना काम करावं लागणार आहे . प्रार्थना स्थळांवर ऑब्जर्वेशन करिता त्यांना आपण ठेवणार आहोत , दोन महिला असतील जे हात जोडून ,वा प्रेमाने नियम लोकांना पाळायला लावतील .

खेळाची मैदान ,बगीचे असतात तिकडे मुलं मास्क लावत नाहीत ,

झिरो मिशन आपण सुरू करतोय , यात जास्तीत जास्त चाचण्या करून , हायरिस्क कॉन्टॅक्ट ट्रेस करणार आहोत . फिरत्या व्हॅन चा वापर करून त्याद्वारे रुग्ण शोधणार आहोत

लक्षणे नाहीत ,पण पोजिटिव्ह असतील त्यांना  , काळजी केंद्रावर दाखल केल जाईल , त्यांना आता होम क्वारंटाईन करणार नाही . कारण होम क्वारंटाई असताना लोक बाहेर फिरताना आढळतात

जम्बो सेंटरची पुन्हा आम्ही पाहणी करतोय

आपली जेवढी विभाग आहेत, तिथे डॅश बोर्ड तयार करतोय, तिथे सगळी माहिती मिळेल

केंद्राच्या नियमाप्रमाणे ब्राझीलमधून येणाऱ्या लोकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं जाणार आहे , बाहेरून येणाऱ्या लोक हॉटेलमध्ये न जाता थेट पळून जातायत , त्यांच्यावर कारवाई केली जाईल .

जर रुग्ण संख्या वाढली तर राज्य सरकारच्या नियमानुसार लॉकडाऊनला सामोरं जावं लागेल , लोकांच्या हातात आहे ,

क्लीनपमार्शल मारहाण करतात असं जर असेल तर ते खरे क्लीनप मार्शल आहेत का ते पाहिलं जाईल. आम्ही त्यांना आता ओळखपत्र देणार आहोत .

1 मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या 

ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोना, कुणाची कोरोनावर मात, तर कोण अजूनही पॉझिटिव्ह 

दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचा नवा स्ट्रेन महाराष्ट्रात, अमरावतीत चार रुग्ण, धोका वाढला 

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.