BMC Election 2022 (ward26): सत्तांतर नाट्याचा प्रभाग क्र. 26 होणार परिणाम?; हिंदुत्त्वाचं कार्ड चालणार की उद्धव ठाकरेंचा करिश्मा

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत प्रभाग क्र. 26 मध्ये अकरा महिला आपल्या नशीब अजमावत होत्या. यावेळी भाजपच्या प्रितम गौतम पंडागळे यांनी शिवसेनेच्या भारत पंडागळे यांच्याबरोबर लढत देऊन विजय खेचून आणला होता. मात्र आता राज्यातील सत्ता भाजप आणि बंडखोर शिंदे गटाकडे असल्याने या सत्तांतराचा या निवडणुकीवर काय परिणाम होणार की, शिवसेना पुन्हा जोरदारपणे मुसंडी मारणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

BMC Election 2022 (ward26): सत्तांतर नाट्याचा प्रभाग क्र. 26 होणार परिणाम?; हिंदुत्त्वाचं कार्ड चालणार की उद्धव ठाकरेंचा करिश्मा
महादेव कांबळे

|

Jul 17, 2022 | 4:26 PM

मुंबईः मुंबई महानगरपालिका निवडणुकीला (Mumbai Municipal Corporation Election 2022) राज्यातील इतर निवडणुकांएवढचं महत्वाचं मानलं जातं. आता नुकताच राज्यात सत्तातंर झालं आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणखी रंगतदार होणार आहेत. जुलै 2022 मध्ये भाजप आणि बंडखोर शिंदे फडणवीस (Shinde-Fadnavis) गटाचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे, त्यामुळे त्याचा परिणाम या निवडणुकीवर शंभर टक्के होणार आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून उमेदरवारांनी आपल्या मतदार संघाकडे विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली असली तर आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांना त्याचा धक्काही बसला आहे. त्यामुळे आता आरक्षणानंतरच हालचालींना आणखी वेग येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 26 (Ward No. 26) मध्येही जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. कारण राज्यात आता हिंदुत्व विचारसरणीचं सरकार आल्याने प्रभाक क्र. 26 वर त्याचा काय परिणाम होणार हे आता निवडणुकीनंतरच ठरणार आहे. मागील निवडणुकीत येथील भाजपच्या वंदना रामदास नांदगावकर या येथून विजयी झाल्या नसल्या तरी शिवसेनेच्या भारती राम पंडागळे यांना निसटता विजय मिळालेला होता. काटे टक्कर झालेल्या या लढतीत भाजपच्या प्रितम गौतम पंडागळे यांनी शिवसेनेच्या भारती राम पंडागळे यांच्यापेक्षा 819 मतांनी त्यांच्यावर विजय मिळविला होता. त्यामुळे यावेळी तर या प्रभागात भाजप-शिवसेना अशी जोरदार टक्कर होणार असल्याचे दिसत आहे.

नशीब अजमवणारे उमेदवार

1.प्रेमाताई गोरखनाथ आदमाने (बहुजन मुक्ती पार्टी)-149 2.ज्योती अर्जुन बोबडे (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी)-70 3.गायकवाड विद्या अतुल (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)-1250 4.भारती संभाजी खोपे (बहुजन समाज पार्टी)-595 5.नरवडे सुनिता राजेश (नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी)-929 6.वंदना रामदास नांदगावकर (भारिप बहुजन महासंघ)-1565 7.भारती राम पंडागळे (शिवसेना)-3129 8.प्रितम गौतम पंडागळे (भारतीय जनता पार्टी)-3948 9.सुनिता पांडुरंग पाखरे (अपक्ष)-267 10.रक्षा दीपक वाघ( इंडियन नॅशनल काँग्रेस)-2345 11.वरीलपैकी एकही नाही -350

एकूण मत 14597

प्रभाग क्र. 26 मध्ये एकूण लोकसंख्या ही 56874 इतकी होती, त्यामध्ये अनुसुचित जाती 2271 तर अनुसुचित जमातीमध्ये 934 इतकी लोकसंख्या होती. मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत प्रभाग क्र. 26 मध्ये अकरा महिला आपल्या नशीब अजमावत होत्या. यावेळी भाजपच्या प्रितम गौतम पंडागळे यांनी शिवसेनेच्या भारत पंडागळे यांच्याबरोबर लढत देऊन विजय खेचून आणला होता. मात्र आता राज्यातील सत्ता भाजप आणि बंडखोर शिंदे गटाकडे असल्याने या सत्तांतराचा या निवडणुकीवर काय परिणाम होणार की, शिवसेना पुन्हा जोरदारपणे मुसंडी मारणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

वॉर्ड कुठून पासून कुठ पर्यंत

पश्चिम द्रुतगती महामार्ग व ठाकुर व्हिलेज रोडच्या जंक्शन पासून ठाकूर व्हिलेज रोडच्या दक्षिणबाजून पूर्वेकडे श्याम नारायण ठाकूर मार्ग ओलांडून नॅशनल पार्कपर्यंत. तेथून नॅशनल पार्कच्या मोकळ्या जागेतून पश्चिमे बाजूने दक्षिणेकडे व पुन्हा दक्षिणबाजूने पूर्वेकडे व पुन्हा पश्चिमबाजूने दक्षिणेकडे व पुन्हा उत्तर बाजूने पश्चिमेकडे मोकळ्या जागेतून फरीद इस्टे रोडपर्यंत.तेथून भूमी व्हॅली इमारतीच्या पूर्वेकडील कुंपण भिंतीच्या मोकळ्या जागेतून पश्चिमबाजूने दक्षिणेकडे व पुढे उत्तर बाजूने पश्चिमकडे व पुढे पूर्वबाजूने उत्तरकडे भूमी बीएमसी गार्डनपर्यंत. तेथून मोकळ्या जागेच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे व पुढे झोपडपट्टीतील पाऊलवाटेच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे व पुढे उत्तरबाजूने पश्चिमेकडे एन जी पार्क सीटी फेज 2 फरीद इस्टेट इमारतींच्या कुंपण भींतीकडून लक्ष्मीनगर रोडपर्यंत. तेथून लक्ष्मीनगर रोडच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे रामसिंग रोड पर्यंत. तेथून राम सिंग रोडच्या उत्तर बाजून पश्चिमकडे पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत. तेथून पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे ठाकूर व्हिलेज रोडच्या जंक्शनपर्यंत आहे.

पक्ष उमेदवारविजयी उमेदवार
भाजप प्रितम गौतम पंडागळे प्रितम गौतम पंडागळे
भारती राम पंडागळे -
काँग्रेस रक्षा दीपक वाघ-
राष्ट्रवादी नरवडे सुनिता राजेश -
मनसेगायकवाड विद्या अतुल -
इतर/अपक्ष--

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें