AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत इतके हजार झाडं लावण्याचा संकल्प, पर्यावरण दिनी लावलेली झाडं जगवणार कोण?

मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपाल‍िका सतत नवनवीन उपक्रम हाती घेत असते. यंदादेखील जागत‍िक पर्यावरण द‍िनान‍िमित्त उद्यान व‍िभागाकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

मुंबईत इतके हजार झाडं लावण्याचा संकल्प, पर्यावरण दिनी लावलेली झाडं जगवणार कोण?
| Updated on: Jun 04, 2023 | 10:51 PM
Share

मुंबई : मुंबईकरांच्या अवतीभवती सदा वृक्षराजी बहरलेली असावी. यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या बृहन्मुंबई महापाल‍िकेच्या उद्यान व‍िभागाने येत्या वर्षभरात मुंबईमध्ये नवीन २५ हजार झाडे लावण्याचा विशेष संकल्प केला आहे. उद्या सोमवारी, ५ जून रोजी जागत‍िक पर्यावरण द‍िनान‍िम‍ित्त दिवसभरात महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रात प्रत्येकी २०० पेक्षा अध‍िक झाडांची लागवड करण्यात येणार आहे. वर्षभरात नागरी वन उपक्रमात आणखी ५० हजार झाडे लावली जाणार आहेत.

मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन आणि संवर्धन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सतत नवनवीन उपक्रम हाती घेतले जातात. गत अनेक वर्षांपासून वृक्षसंवर्धन आण‍ि वृक्षारोपणाचे कार्य अखंडपणे सुरू असल्यानेच मुंबईकरांच्या अवतीभोवती वृक्षराजी दाटलेली आढळते. बृहन्मुंबई महानगरपाल‍िकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अत‍िर‍िक्त महानगरपाल‍िका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्व‍िनी भ‍िडे, उपायुक्त (उद्याने) श्री. किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागामार्फत सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.

जागतिक स्तरावर दखल

मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन आणि संवर्धन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांची दखल अलीकडे जागतिक स्तरावरदेखील घेण्यात आली आहे. अन्न आणि कृषी संघटना (Food and Agriculture Organization) आणि आर्बर डे फाउंडेशनकडून (Tree Cities of The World) “जागतिक वृक्ष नगरी ” हा अत‍िशय प्रत‍िष्ठेचा पुरस्कार सन २०२१ आण‍ि २०२२ अशी सलग दोन वर्ष मुंबई महानगराला म‍िळाला आहे.

मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपाल‍िका सतत नवनवीन उपक्रम हाती घेत असते. यंदादेखील जागत‍िक पर्यावरण द‍िनान‍िमित्त उद्यान व‍िभागाकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याचा एक भाग २५ हजार वृक्ष लागवडीचा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

वर्षभरात ५० हजार झाडं लावणार

५ जून रोजी उद्यान व‍िभागाकडून सर्व २४ विभागांमध्ये प्रात‍िन‍िधीक स्वरुपात प्रत्येकी २०० झाडे लावण्यात येणार आहेत. येत्या वर्षभरात मुंबईमध्ये पारंपर‍िक पद्धतीने २५ हजार झाडे लावण्याचा मानस आहे. याश‍िवाय नागरी वने (मियावाकी) पद्धतीने वर्षभरात ५० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. प्रामुख्याने सोनचाफा, सीता अशोक, तामण, बकुळ, कांचन, बहावा, जांभूळ, नारळ, कडूनिंब, आंबा, पेरू, करंज, वड, पिंपळ यासारख्या स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मुंबईकरांनी प्रयत्न केले पाहिजेत, असं आवाहनही या न‍िम‍ित्ताने करण्यात येणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.