हाय प्रोफाईल लोकांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न, वकिलाच्या घरात शिरताच रंगेहाथ बेड्या

उच्च न्यायालयातील वकिलाच्या बंगल्यामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने गेलेल्या 2 आरोपीस रंगेहात अटक करण्यात आलंय. (mumbai police arrested thie)

हाय प्रोफाईल लोकांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न, वकिलाच्या घरात शिरताच रंगेहाथ बेड्या
MUMBAI THEFT
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 5:11 PM

मुंबई : उच्च न्यायालयातील वकिलाच्या बंगल्यामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने गेलेल्या 2 आरोपीस रंगेहात अटक करण्यात आलंय. मुंबईतील कांदवली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मुंबईतील हायप्रोफाईल भागांमध्ये मोठमोठ्या बंगल्यांमध्ये घुसून हे आरोपी चोरी करुन फरार व्हायचे.  मात्र यावेळी त्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावं नित्यानंद देवेंद्र तसेच गणेश देवेंद्र अशी आहेत. (Mumbai police arrested 2 thief who trying to theft in senior advocate bungalow)

नेमका प्रकार काय ?

मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले 2 चोर मुंबईमधील हायप्रोफाईल भागात जाऊन चोरी करायचे. मोठा ऐवज हातात लागताच ते तिथून फरार व्हायचे. काही दिवसानंतर ते पुन्हा नव्या ठिकाणी चोरी करायचे. मुंबई भागातील कांदिवली पश्चिम परिसरातसुद्धा हाय प्रोफाईल लोकांची घरं आहेत. यामध्ये काही वकिलांचासुद्धा समावेश आहे. यातीलच उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या एका वकिलाच्या घरी या चोरट्यांनी चोरी करण्याचं ठरवलं. या चोरट्यांनी वरिष्ठ वकिलाच्या बंगल्यामध्ये शिरण्याचा निर्णय घेतला.

वकिलाने चोरट्यांना सीसीटीव्हीमध्ये पाहिले

मात्र, चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरलेल्या या दोन चोरांस वकिलाने आपल्या घराच्या समोर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये पाहिले. हे समजताच वकीलाने बंगल्याचे सर्व दरवाजे बंद केले. तसेच नंतर पोलिसांना या सर्व घटनेची माहिती दिली.

काही क्षणांत पोलीस पोहोचले

दरम्यान वकिलाने कांदिवली पोलिसांना माहिती देताच ते तत्काळी घटनास्थळी दाखल झाले. या पोलिसांनी सापळा रचत दोन्ही चोरट्यांना रंगेहाथ पकडले. पकडलेल्या दोन्ही आरोपींची नावं नित्यानंद देवेंद्र तसेच गणेश देवेंद्र अशी आहेत. सध्या पोलिसांनी आरोपीला पकडले असून ते पुढील कारवाई करत आहेत.

इतर बातम्या :

VIDEO : नेमकं असं काय घडलं ज्यामुळे पतीने स्वत:च्या गर्भवती पत्नीवर गोळ्या झाडल्या? थरार सीसीटीव्हीत कैद

25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, नागपुरात वरिष्ठ डॉक्टरला बेड्या

तांदूळ व्यापाऱ्यावर कार्यालयात गोळीबार, छातीत गोळी लागून रमेश अग्रवाल गंभीर जखमी

(Mumbai police arrested 2 thief who trying to theft in senior advocate bungalow)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.