Unlock Mumbai | मुंबईतील निर्बंधांविषयी पोलीस आयुक्तांकडून स्पष्टता, दोन किमीच्या ‘लक्ष्मणरेषे’चा उल्लेख नाही

याआधी, घरापासून फक्त 2 किमीच्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल, असे मुंबई पोलिसांनी ट्वीट करुन म्हटले होते.

Unlock Mumbai | मुंबईतील निर्बंधांविषयी पोलीस आयुक्तांकडून स्पष्टता, दोन किमीच्या 'लक्ष्मणरेषे'चा उल्लेख नाही
Follow us
| Updated on: Jul 03, 2020 | 9:57 AM

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील निर्बंधांविषयी माहिती दिली आहे. नव्या आदेशात दोन किलोमीटरच्या ‘लक्ष्मणरेषे’चा स्पष्ट उल्लेख नाही, मात्र जवळच्या जवळ जाणे बंधनकारक असेल, असे आयुक्तांनी म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घरापासून लांब भटकू नये, आवश्यक खरेदीसाठी जवळच्या दुकानातच जावे, असे आवाहन केले जात आहे. (CP clarifies Restrictions in Unlock Mumbai)

दुकाने, मार्केट, केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर, शारीरिक व्यायाम (outdoor physical activities) यासाठी घराजवळच जाणे बंधनकारक राहील, असे नव्या आदेशात म्हटले आहे. पहाटे 5 ते संध्याकाळी 7 या दरम्यान नागरिकांना त्यांच्या शेजारच्या मोकळ्या जागांवर सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे असे व्यायाम करता येतील. हे आदेश 15 जुलै मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लागू असतील.

याआधी, घरापासून फक्त 2 किमीच्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल. 2 किमीच्या बाहेर जाऊ नये, असे मुंबई पोलिसांनी ट्वीट करुन म्हटले होते. मात्र नव्या आदेशात ‘जवळ’ या शब्दाची नेमकी व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली नाही. तरीही नागरिकांनी घराच्या निकटच जाणे पोलिसांना अपेक्षित आहे.

काय आहेत नियम?

-परवानगी दिलेल्या खरेदी व सेवांसाठी शेजारच्या दुकानांचा वापर करा. (पहाटे 5 ते रात्री 9)

-परवानगी दिलेल्या कामासाठी प्रवास करताना ऑफिसचे ओळखपत्र/ कागदपत्रे बाळगा

-स्वतःच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही गर्दी करु नका (कलम 144)

-आपत्कालीन / वैद्यकीय सेवा आणि पुरवठा वगळता रात्रीचा कर्फ्यू – रात्री 9 ते पहाटे 5

पहाटे 5 ते संध्याकाळी 7 या दरम्यान नागरिकांना त्यांच्या शेजारच्या मोकळ्या जागांवर वैयक्तिक शारिरीक व्यायाम (सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे) यासाठी जाता येईल.

अ. कंटेन्मेंट झोनमध्ये आवश्यक सेवा आणि वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मज्जाव ब. मुंबई शहरात रात्री नऊ ते पहाटे पाच या वेळेत बाहेर फिरण्यास बंदी

अपवाद : 1. अन्न, भाजी, दूध, रेशन आणि धान्य पुरवठा 2. हॉस्पिटल, औषधे, फार्मास्युटिकल निगडीत कामे 3. टेलीफोन आणि इंटरनेट सेवा 4. बॅंकिंग, स्टॉक एक्स्चेंज 5. आयटी सेवा 6. प्रसारमाध्यमे 7. बंदरे 8. अन्न, धान्य आणि आवश्यक सेवांची होम डिलिव्हरी 9. ई-कॉमर्स सेवा 10. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा 11. गोदामे

आवश्यक नसलेल्या सेवांसाठी पहाटे पाच ते रात्री नऊ या वेळेतही बंदी

आधीच्या आदेशात काय?

1. घरापासून फक्त 2 किमीच्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल. 2 किमीच्या बाहेर जाऊ नये.

2. व्यायामाची परवानगी घरापासून 2 किमीच्या परिघातील मोकळ्या जागेपुरतीच मर्यादित आहे.

3. कार्यालय किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतच 2 किमीच्या बाहेर जाण्याची परवानगी आहे.

संबंधित बातमी :

मुंबईतील ‘दोन किमी’ प्रवासमर्यादेचा नियम बदलावा, काँग्रेसचे पोलीस आयुक्तांना आवाहन

(CP clarifies Restrictions in Unlock Mumbai)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.