मुंबईतील ‘दोन किमी’ प्रवासमर्यादेचा नियम बदलावा, काँग्रेसचे पोलीस आयुक्तांना आवाहन

दोन किलोमीटरचा नियम मुंबई पोलिस आयुक्तांनी बदलण्याची आवश्यकता आहे, असं काँग्रेस खासदार राजीव सातव म्हणाले.

मुंबईतील 'दोन किमी' प्रवासमर्यादेचा नियम बदलावा, काँग्रेसचे पोलीस आयुक्तांना आवाहन
राजीव सातव, काँग्रेस
Follow us
| Updated on: Jun 30, 2020 | 10:33 AM

नवी दिल्ली : “महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला, तो आवश्यक आहे, मात्र दोन किलोमीटर परिसराबाबत मुंबई पोलिसांनी घेतलेला निर्णय बदलण्याची गरज आहे, असे मत काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी व्यक्त केले आहे. (Congress Appeals Mumbai Police Commissioner to change Two KM Rule)

“महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात काही शिथिलता आणण्याचेही सांगितले आहे, मात्र त्या शिथिलता लोकाभिमुख आणि नागरिकांना उपयुक्त असाव्यात. ज्या अनुषंगाने आकडेही (कोरोनाग्रस्त रुग्ण) वाढता कामा नयेत, गरज असेल तिथे बंधने आवश्यक आहेतच, मात्र जिथे गरज नाही, जसे की दोन किलोमीटरचा नियम त्यांनी मुंबईत सुरु केला आहे, त्यामुळे आज जी स्थिती निर्माण झाली आहे. मला असं वाटतं की मुंबई पोलिस आयुक्तांनी हा निर्णय बदलण्याची आवश्यकता आहे.” असं राजीव सातव म्हणाले.

काय आहेत निर्बंध?

1. घराबाहेरील हालचाली केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच कराव्यात.

2. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे.

3. घरापासून फक्त 2 किमीच्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल. 2 किमीच्या बाहेर जाऊ नये.

4. व्यायामाची परवानगी घरापासून 2 किमीच्या परिघातील मोकळ्या जागेपुरतीच मर्यादित आहे.

5. कार्यालय किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतच 2 किमीच्या बाहेर जाण्याची परवानगी आहे.

6. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

7. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

8. सोशल डिस्टन्सिंगचे निकष न पाळणारी दुकाने इत्यादी बंद करण्यात येतील.

9. रात्री 09. 00 ते पहाटे 05.00 या वेळेत असलेल्या कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनी बाहेर फिरल्यास कडक कारवाई केली जाईल.

10. वैध कारणाशिवाय आपल्या स्थानिक भागापासून दूर आढळून येणारी सर्व वाहने जप्त केली जातील.

सर्व नागरिकांनी जबाबदारीने वागून अनावश्यक फिरणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

 मुंबई पोलिसांच्या नावे फेक मेसेज व्हायरल, दोघं बाहेर पडल्यास अटक होण्याचे दावे खोटे

Unlock 2 | ‘अनलॉक 2’मध्ये दोन किमीची ‘लक्ष्मणरेषा’, काय आहेत निर्बंध?

(Congress Appeals Mumbai Police Commissioner to change Two KM Rule)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.