फेसबुकचं जबराट तंत्रज्ञान, थेट आयर्लंडमधून फोन, मुंबई पोलिसांनी वायू वेगाने शेफला आत्महत्येपासून रोखलं

फेसबुकवर पोस्ट टाकून आत्महत्या करणाऱ्या एका व्यक्तीचा मुंबई पोलिसांच्या सतर्कमुळे जीव वाचला (Mumbai Police Save Suicidal Person) आहे.

फेसबुकचं जबराट तंत्रज्ञान, थेट आयर्लंडमधून फोन, मुंबई पोलिसांनी वायू वेगाने शेफला आत्महत्येपासून रोखलं
Namrata Patil

|

Aug 10, 2020 | 8:52 PM

मुंबई : फेसबुकवर पोस्ट टाकून आत्महत्या करणाऱ्या एका व्यक्तीचा मुंबई पोलिसांच्या सतर्कमुळे जीव वाचला आहे. कोरोनामुळे हाताला काम नाही, मानसिक तणाव वाढल्याच्या कारणावरुन माणूस तणावाखाली जातो. आपले जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतो, अशी पोस्ट टाकत एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. ही पोस्ट टाकल्यानंतर परदेशातील अनेकांनी तो पाहिला. त्यानंतर दिल्ली आणि मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला जीवनदान मिळाले. (Mumbai Police Save Suicidal Person)

दिल्ली पोलिसांना आयर्लंडच्या फेसबुक कार्यालयातून फोन आला. त्यात पोलिसांना एक जण आत्महत्या करणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तत्परतेने याबाबतचा तपास सुरु केला.

पोलिसांनी तांत्रिक मदत घेत त्या व्यक्तीचा शोध घेतला. मात्र त्या व्यक्तीच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांना धक्का बसला. ज्या अकाऊंटवर त्याने ही पोस्ट टाकली होती, ते एका महिलेचे अकाऊंट होते. मात्र तिचे अकाऊंट तिचा पती वापरत होता. माझा नवरा 14 दिवसांपूर्वी भांडण झाल्यानंतर घरातून निघून गेला आहे. तो मुंबईत काम करतो, अशी माहिती त्या महिलेने दिल्ली पोलिसांना दिली.

दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला याची माहिती दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सक्रिय होत त्या माणसाचा ठावठिकाणा शोधून काढला.

काही तांत्रिक मदत घेत भाईंदरमधील आचारी असलेल्या माणसाला ताब्यात घेतले. पारिवारिक भांडणामुळे त्याची मनःस्थितीत बिघडली होती. त्यामुळे टोकाचे पाऊल उचलण्याचा त्याने निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी त्याचे समुपदेशन करीत आत्महत्येचा निर्णय बदलायला लावला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. (Mumbai Police Save Suicidal Person)

संबंधित बातम्या :

अल्पवयीन भाचीला अश्लील व्हिडीओ पाहण्याची बळजबरी, पुण्यात मावशीसह प्रियकराला अटक

आधी ओळख, मग मोठ्या नफ्याचं आमिष, झांबियातील भारतीयांकडून पुणेकर व्यवसायिकांना तब्बल पावणेदोन कोटींना गंडा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें