अल्पवयीन भाचीला अश्लील व्हिडीओ पाहण्याची बळजबरी, पुण्यात मावशीसह प्रियकराला अटक

लॉकडाऊनच्या काळात मावशी आणि तिचा बॉयफ्रेंड आपल्या अल्पवयीन भाचीला तिच्या इच्छेविरोधात अश्लील चित्रफीत दाखवून शोषण करत असल्याचा आरोप आहे.

अल्पवयीन भाचीला अश्लील व्हिडीओ पाहण्याची बळजबरी, पुण्यात मावशीसह प्रियकराला अटक

पुणे : अल्पवयीन भाचीला जबरदस्तीने अश्लील चित्रफीत दाखवणाऱ्या मावशीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मावशी आणि तिच्या प्रियकराला पुणे पोलिसांनी अटक केली. (Pune Aunt arrested with boyfriend for showing vulgar video clip to minor niece)

लॉकडाऊनच्या काळात मावशी आणि तिचा बॉयफ्रेंड आपल्या अल्पवयीन भाचीला तिच्या इच्छेविरोधात अश्लील चित्रफीत दाखवून शोषण करत असल्याचा आरोप आहे. एप्रिल महिन्यात पुण्यातील कोंढवा परिसरात हा प्रकार घडला.

पीडित मुलीने धीर एकवटत आपल्या आईला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर आईने कोंढवा पोलीस ठाण्यात आपली बहीण आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. पुणे पोलिसांनी या प्रकरणात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन मावशी आणि तिच्या प्रियकराला अटक केली.

नेमकं काय घडलं?

एप्रिल महिन्यात लॉकडाऊन सुरु असताना पीडित मुलीची आई आपल्या चार मुलांना बहिणीकडे सोडायची. यावेळी मावशीचा प्रियकर तिला भेटण्यासाठी घरी यायचा. मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार मावशी आणि तिचा प्रियकर इच्छेविरोधात तिला अश्लील चित्रफीत दाखवत होते.

मुलीने इतके महिने या प्रकरणी वाच्यता केली नव्हती. परंतु जवळपास चार महिन्यांनी हिंमत दाखवत तिने आपल्या आईला घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली, असे कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितलं.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची कोरोना चाचणी केली आहे. यामध्ये दोन्ही आरोपींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

गंभीर गुन्हा असल्यामुळे न्यायालयानेही आरोपींना कोठडीत टाकण्याची परवानगी दिली, मात्र कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे जेल प्रशासन आरोपींना दाखल करुन घेत नसल्याची माहिती आहे.

दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून सध्या या आरोपींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचार झाल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. (Pune Aunt arrested with boyfriend for showing vulgar video clip to minor niece)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *