AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकर आज पाहणार समुद्राचं रौद्ररूप; मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे, समुद्राला आलेल्या भरतीमुळे आज संध्याकाळी दहा वाजता समुद्रात 5 ते 6 मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत, कोणीही समुद्राच्या जवळ जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईकर आज पाहणार समुद्राचं रौद्ररूप; मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 23, 2025 | 4:57 PM
Share

राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे,  अवकाळी पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. दुसरीकडे चाकरमान्यांचे देखील हाल सुरूच आहेत.

दरम्यान आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईसाठी हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  समुद्राला येणाऱ्या भरतीमुळे आज रात्री दहा वाजत समुद्र रौद्ररूप धारण करणार आहे,  समुद्रात भरतीमुळे आज चार ते पाच मिटर उंच लाटा उसळणार आहेत.  त्यामुळे या काळात नागरिकांनी समुद्राच्या जास्त जवळ जाण्याचे धाडस करू नये, असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.

मुंबईत पावसाचा इशारा  

मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा मुंबईत हवामान खात्याकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून सतर्कतेच आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान कोकण आणि गोवा किनार पट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील 36 तासांमध्ये हा कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 36 तासांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे.

मान्सून वेळेपूर्वीच दाखल होण्याची शक्यता 

दुसरीकडे यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल होण्याची शक्यता आहे. 25 मे पर्यंत केरळात मान्सूनची एन्ट्री होऊ शकते असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.  2009 मध्ये मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला होता, त्यानंतर आता तब्बल 16 वर्षांनी मान्सूनचं वेळेपूर्वी आगमन होण्याची शक्यता आहे. येत्या 25 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, त्यांनंतर हळहळू मान्सून संपूर्ण देश व्यापेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा पावसाचं प्रमाण हे सरासरी पेक्षा अधिक असणार आहे. देशात यंदा 107  टक्क्यांच्या आसपास पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल