Mumbai Rains : मुंबईत तापमान 9 अंशानी घटलं, IMD कडून यलो अलर्ट, आजही पावसाचा इशारा

डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळं मुंबईत नव्या दोन गोष्टींची नोंद झाली आहे. मुंबईतील तापमान 9 अंशानं घटून 33.3 वरुन 24.8 वर आलं आहे.

Mumbai Rains : मुंबईत तापमान 9 अंशानी घटलं, IMD कडून यलो अलर्ट, आजही पावसाचा इशारा
Mumbai Rain

मुंबई: मुंबईसह राज्यातील (Mumbai Rain) विविध जिल्ह्यात आजही अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) हजेरी लावण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के. ए. होसाळीकर यांनी राज्यात पुढील तीन ते चार तासात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे.रायगड, ठाणे, मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं मुंबईला यलो अ‌ॅलर्ट (Mumbai Yellow Alert) दिला असून कोकण, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईतील तापमान 9 अंशानं घटलं

डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळं मुंबईत नव्या दोन गोष्टींची नोंद झाली आहे. मुंबईतील तापमान 9 अंशानं घटून 33.3 वरुन 24.8 वर आलं आहे. तर, मुंबईत डिसेंबरमधील 24 तासातील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाच्या पावसाची नोंद देखील झाली आहे. बुधवारी बारा तासात सांताक्रुझ येथील पर्जन्यमापकात 41.6 मिमी पावसाची नोंद झाली. तर, कुलाबा येथील पर्जन्यमापकात 43.2 मिमी पावसाची नोंद झाली.

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

राज्यात पुढील 24 तासात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्यान हवामान विभागानं मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये, असा इशारा प्रादेशिक हवामान केंद्राच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी दिला आहे. अरबी समुद्रात वेगवान वारे सुटले असून त्याचा वेग वाढत असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असं सांगण्यात आलं आहे.

मुंबईला यलो अ‌ॅलर्ट

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबई मध्ये पहाटेच्या वेळी हळूहळू पाऊस अनेक ठिकाणी सुरु होता. हवामान खात्याने मुंबई मध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिवच्या परिसरात चक्रीवादळ मुळे पाऊस पडत आहे.

हेही पाहा

इतर बातम्या :

Param Bir Singh | परमबीर सिंग यांची गच्छंती अटळ, निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही?

Weather Update | राज्यात उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी, मच्छिमारांनाही समुद्रात जाण्यास मनाई

Mumbai Rain Update IMD issue yellow alert temperature drops by 9 points

Published On - 10:01 am, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI