AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | मुंबई-ठाण्यात थिएटरचालकांचा आडमुठेपणा, शासनाच्या आदेशानंतरही तिकीटविक्री सुरु

सायन भागातील पीव्हीआर, ठाण्यातील सिनेमॅक्स थिएटरमध्ये शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत तिकीट विक्री सुरु ठेवण्यात आली Mumbai Theater open after Corona Advisory

Corona | मुंबई-ठाण्यात थिएटरचालकांचा आडमुठेपणा, शासनाच्या आदेशानंतरही तिकीटविक्री सुरु
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 14, 2020 | 3:42 PM
Share

मुंबई : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपुरातील नाट्यगृह आणि सिनेमागृहं पुढील काही दिवस बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतरही काही थिएटरचालकांचा आडमुठेपणा सुरु आहे. कोरोनाच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सूचना जारी करण्यात आल्यानंतरही मुंबईतील काही थिएटरमध्ये तिकीट विक्री सर्रासपणे सुरु होती. (Mumbai Theater open after Corona Advisory)

सायन भागातील पीव्हीआर, ठाण्यातील सिनेमॅक्स थिएटरमध्ये शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत तिकीट विक्री सुरु ठेवण्यात आली. मराठी चित्रपट निर्मात्यांनी शासनाचा आदेश प्रामाणिकपणे मानून तिकीट विक्री थांबवली. मात्र ‘अंग्रेजी मीडियम’, ‘बागी 3’ यासारख्या हिंदी सिनेमांची तिकीट विक्री सकाळच्या वेळेस सुरुच होती. ‘टीव्ही9 मराठी’च्या प्रतिनिधींनी विचारणा केल्यानंतर आधी उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. त्यानंतर काही वेळाने तिकीट विक्री थांबवण्यात आली.

कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेल्या मुंबई, ठाणे, पुणे, नागपुरातील सिनेमागृहे, नाट्यगृहे, जिम आणि स्विमिंग पूल मध्यरात्रीपासून बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केला. खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. फक्त दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु राहणार असून पर्यायाने शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांनाही शाळेत हजेरी लावणं अनिवार्य आहे.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील मल्टिप्लेक्स बंद ठेवण्यात आले आहेत. पुण्यातील एकूण 39 मल्टिप्लेक्स बंद राहणार आहेत. या व्यवसायातून दर आठवड्याला होणारी आठ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. दर आठवड्याला एका थिएटरची उलाढाल 20 ते 25 लाखांच्या आसपास आहे. त्याचाही फटका चित्रपटगृहाच्या मालकांना बसणार आहे. या निर्णयामुळे आगामी सूर्यवंशी आणि 83 या दोन मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. (Mumbai Theater open after Corona Advisory)

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 19 वर पोहचली आहे. अहमदनगरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे आकडा वाढला.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण 

  • पुणे – 10
  • नागपूर – 3
  • मुंबई – 4
  • ठाणे – 1
  • अहमदनगर – 1

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले? 

      1. पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
      2. पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
      3. पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
      4. पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
      5. मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
      6. नागपूर (1) – 12 मार्च
      7. पुणे (1) – 12 मार्च
      8. पुणे (3) – 12 मार्च
      9. ठाणे (1) – 12 मार्च
      10. मुंबई (1) – 12 मार्च
      11. नागपूर (2) – 13 मार्च
      12. पुणे (1) – 13 मार्च
      13. अहमदनगर (1) – 13 मार्च
      14. मुंबईत (1) – 13 मार्च

Mumbai Theater open after Corona Advisory

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...