AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो लक्ष द्या! एल्फिन्स्टन पुलामुळे वाहतुकीत अनेक बदल, कोणते रस्ते चालू कोणते बंद?

मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिज पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 12 सप्टेंबरच्या रात्रीपासून या तोडकामास सुरुवात झाली आहे. या तोडकामामुळे मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

मुंबईकरांनो लक्ष द्या! एल्फिन्स्टन पुलामुळे वाहतुकीत अनेक बदल, कोणते रस्ते चालू कोणते बंद?
elphinstone bridge and new traffic rules
| Updated on: Sep 13, 2025 | 2:43 PM
Share

Elphinstone Bridge : मुंबईतील साधारण 125 वर्षांपूर्वीचा एल्फिन्स्टन ब्रिज तोडण्यास सुरुवात झाली आहे. 12 सप्टेंबरच्या रात्रीपासून चोख पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली जात आहेत. एकूण 60 दिवस या पुलाचे तोडकाम चालणार आहे. दरम्यान, आता या तोडकामाचा मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी सध्याच्या वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल केले आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांनी घराबाहेर पडण्याआधी कोणत्या मार्गाने वाहतूक चालू आहे आणि कोणती वाहतूक वळवण्यात आली आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी याची सविस्तर माहिती दिलेली आहे.

वाहतुकीचे मार्ग बदलण्याचा निर्णय

एल्फिन्स्टन ब्रिजचे तोडकाम सुरू झाल्याने करी रोड ब्रिज, परळ ब्रिजवर वाहतूक कोंडीची समस्या उभी राहिली आहे. करी रोड नाक्यावर सकाळपासून वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून, वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर दिशा ठरविण्याचे काम करण्यात आले आहे. एल्फिन्स्टन ब्रिज हा प्राभादेवी (West) आणि परळ (East) या भागांना जोडतो. मात्र या ब्रिजवरील नवीन रचणेनुसार हा पूल डबल डेकर बनविण्यात येत असून या पुलाचे काम एकूण दोन वर्षे चालणार आहे.

वाहतुकीच्या नियमात काय काय बदल झाले?

एल्फिन्स्टन ब्रिजच्या तोडकामामुळे वाहतूक पोलिसांनी पूर्वेकडून पश्चिमेकडे, आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांची दिशा ठरवली आहे. करीरोड ब्रिजवरील वाहतूक वनवे करण्यात आली असून ही वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे. परेल पूर्वेकडून प्रभादेवी व लोअर परेलकडे जाणाऱ्या वाहनांसाठी करिरोड ब्रिज चालू ठेवण्यात आला आहे. सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत हा करिरोड ब्रिज वन वे करण्यात आला आहे. तर रात्री 11 नंतर सकाळी 7 वाजेपर्यंत पर्यंत या ब्रिजवरील दोन्ही लाईन चालू असणार आहेत. पूर्वेकडून पश्चिमेला जाणाऱ्या वाहनांकरिता दादर पूर्वकडून दादर पश्चिमेकडे व दादर मार्केटकडे जाणारी वाहने टिळक ब्रिजचा वापर करतील. परेल-भायखळा पूर्व, प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सी लिंकच्या दिशेने जाणारी वाहने चिंचपोकळी ब्रिजचा वापर करतील.

कोणकोणता भाग नो पार्किंग झोन?

पश्चिमेकडून पूर्वेला जाणाऱ्या वाहनांकरिता, दादर पश्चिमेकडून दादर पूर्वेकडे जाणारे वाहन टिळक ब्रिजचा वापर करतील. प्रभादेवी व लोअर परेल पश्चिमेकडून परेलला, टाटा रुग्णालय, के ई एम रुग्णालयाकडे जाण्यासाठी दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत करी रोडचा वापर करता येईल.कोस्टल रोड, सी लिंकने व प्रभादेवी वरळीकडून परेल भायखळा पूर्वेकडे जाणारे वाहन चिंचपोकळी ब्रिजचा वापर करतील. ना म जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, भवानी शंकर मार्ग, रावाबहाद्दूर एस के बोले मार्ग, संपूर्ण दोन्ही मार्गिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग नो पार्किंग झोन करण्यात आले आहेत.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.