Mumbai Land slide: वसईत दरड कोसळून बाप-लेक ठार; पवईतही घरावरच कोसळली दरड; कात्रज घाटात रस्तावर दगड

महादेव कांबळे, Tv9 मराठी

Updated on: Jul 13, 2022 | 6:01 PM

वसई राजवलीच्या वाघरल पाडा येथे दरड कोसळून त्याखाली सहा जण अडकले होते, त्यातील चार जणांना काढले असून ढिगाऱ्याखाली बाप-लेक सापडून ठार झाल्याने हळहळ व्यक्त केली जातआहे. ढिगारा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Mumbai Land slide: वसईत दरड कोसळून बाप-लेक ठार; पवईतही घरावरच कोसळली दरड; कात्रज घाटात रस्तावर दगड

मुंबईः गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (Heavy Rain in Mumbai) कोसळत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत, तर मुंबईसह कोकणातील काही भागात दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. मुंबईतील वसई राजवलीच्या वाघरल पाडा (Vasai Rajavali Wagharal Pada) येथे दरड कोसळून त्याखाली सहा जण अडकले होते, त्यातील चार जणांना काढले असून ढिगाऱ्याखाली बाप-लेक सापडून ठार झाल्याने हळहळ व्यक्त केली जातआहे. ढिगारा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे. पवईतील इंदिरानगर परिसरात दरड कोसळले (Land slide) असून यामध्ये दोन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दल रवाना आहे.

ढिगाऱ्याखालून चार जणांना काढले

वसई राजवलीच्या वाघरल पाडा या परिसरातही दरड कोसळून दुर्घटना घडली असून ढिगाऱ्याखाली 6 जण अडकले होते, त्यानंतर चार जणांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले आहे मात्र मातीच्या ढिगाऱ्याखाली मुलगा आणि बाप अडकून ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी वालीव पोलीस, वसई विरार महापालिका अग्निशमन दल दाखल झाले असून रेस्क्यू करण्याचे काम सुरू आहे.

राजीवली वाघराल पाडा परिसरात भूमाफियांनी डोंगर खोदून चाळी बांधल्या आहेत. अनेक चाळी या दरडीच्या पायथ्याशी आहेत, त्याच चाळीतील 2 घरांवर ही दरड कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे.

कल्याण नगर महामार्गावर दरड कोसळली

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने ठाणे जिल्ह्यातील अनेक गावांना पावसाने प्रचंड झोडपून काढले आहे. आज सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कल्याण नगर महामार्गावरील मोरोशी जवळील दिवाण पाडा परिसरात दरड कोसळली आहे, मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. रस्त्यावरच दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून घटनास्थळी टोकवडे पोलीस दाखल झाले आहेत.

 कात्रज जुना बोगदा परिसरातही दरड कोसळली

पुणे परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने त्या परिसरातही दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. पुण्यातील कात्रज जुना बोगदा परिसरातही दरड कोसळली असून रस्त्यावर मोठा दगड येऊन पडला होता. रस्त्यावर दगड आल्याने काहीकाळ कात्रज घाटात वाहतूक कोंडीही झाली होती. त्यानंतर वाहतुकीला अडथळा आल्याने तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्यात आली. पुणे परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI