AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो काळजी घ्या, लवकरच मोठं संकट कोसळणार, इशारा काय?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा ३२ टक्क्यांवर आल्याने मुंबईत ६ टक्के पाणी कपातीचा इशारा; महापौर रितू तावडे यांनी नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले.

मुंबईकरांनो काळजी घ्या, लवकरच मोठं संकट कोसळणार, इशारा काय?
water issue 1
| Updated on: Apr 17, 2026 | 12:34 PM
Share

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. सध्या धरणांमध्ये केवळ ३२ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पाणी कपातीचा इशारा दिला आहे. मुंबईत संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरात ६ टक्के पाणी कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या जलाशयांमध्ये केवळ ३२ टक्के पाणी उपलब्ध आहे. पाण्याचे नियोजन पाहता ६ टक्के पाणी कपातीचा इशारा देण्यात आला आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा अत्यंत जपून आणि काटकसरीने वापर करावा, असे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

हवामान विभागाचा अंदाज आणि तयारी

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सूनचे आगमन ३१ जुलैपर्यंत होण्याचा अंदाज आहे. जोपर्यंत पावसाळ्याला सुरुवात होत नाही, तोपर्यंत उपलब्ध पाणीसाठा योग्य पद्धतीने वापरणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून या काळात पाणी गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरीही नागरिकांनी पाणी साठवून ठेवताना आणि वापरताना खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

त्यामुळे पाणी बचतीसाठी नागरिकांनी घरामध्ये पाण्याचा जपून वापर करावा, अनावश्यक कारणांसाठी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि स्थानिक पातळीवर पाणी टंचाईच्या तक्रारी असल्यास पालिकेशी संपर्क साधावा, असेही महापौरांनी सुचवले आहे.

धरणांमधील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये):

  • भातसा: २,३५,४३९
  • मध्य वैतरणा: ६९,१०६
  • अप्पर वैतरणा: ७७,०४५
  • तानसा: ४०,८१७
  • मोडक सागर: ४५,३४०
  • विहार: १५,३५३
  • तुळशी: ३,२७४

भातसा धरणामध्ये सर्वात जास्त साठा

दरम्यान मुंबईला तानसा, भातसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाते. १५ एप्रिल २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार, भातसा धरणामध्ये सर्वात जास्त साठा आहे. यंदा कडक उन्हाळ्यामुळे आणि अल-निनो या हवामान बदलाच्या परिणामामुळे मुंबईवर पाणी टंचाईचे संकट पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आतापासूनच पाणी जपून वापरण्यास सुरुवात करावी आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असा सल्ला पालिकेने नागरिकांना दिला आहे.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट...

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?