Mumbai Water Supply Cut | मुंबईत 5 ऑगस्टपासून 20 टक्के पाणी कपात, पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन

यंदा पावसाळ्यामध्ये जून आणि जुलै महिन्‍यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला (Mumbai Water Supply Cut 20 percent) आहे.

Mumbai Water Supply Cut | मुंबईत 5 ऑगस्टपासून 20 टक्के पाणी कपात, पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन
Namrata Patil

|

Aug 01, 2020 | 12:44 AM

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात येत्या 5 ऑगस्टपासून पाणी कपात करण्यात येणार आहे. यानुसार मुंबईत 20 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. कमी पावसामुळे पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचा आवाहन पालिका प्रशासनाने घेतला आहे. (Mumbai Water Supply Cut 20 percent)

यंदा पावसाळ्यामध्ये जून आणि जुलै महिन्‍यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात फक्त 34 टक्के पाण्याचा साठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात 85.68 टक्के आणि 2018 च्या जुलैमध्ये 83.30 टक्के जलसाठा होता.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

हीच परिस्थिती यापुढेही राहिल्‍यास पावसाळा संपल्‍यानंतरही पालिकेकडे पुरेसा जलसाठा उपलब्‍ध होऊ शकणार नाही. मुंबईचा पाणीपुरवठा 31 जुलै 2021 पर्यंत सुरळीपणे चालू ठेवण्‍यासाठी पाणी पुरवठ्यात 5 ऑगस्टपर्यंत 20 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्‍या जल अभियंता खात्‍याद्वारे देण्‍यात आली आहे.

ही पाणीकपात मुंबई महापालिकेतर्फे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांनासुद्धा लागू राहील. तरी सर्व नागरिकांनी या कालावधीत पाण्‍याचा योग्य पद्धतीने वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे. (Mumbai Water Supply Cut 20 percent)

संबंधित बातम्या : 

मुंबईत अवघ्या 30 लाखात घर, ठाकरे सरकारची योजना, ऑक्टोबरमध्ये भूमीपूजन?

Tulsi Lake Overflow | मुंबईकरासाठी आनंदाची बातमी, तुळसी तलाव ओव्हर फ्लो

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें