मुंबईकरांचा बेफिकीरपणा, विनामास्क फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. (Mumbai Without Masks Wearing People Number Increase)

मुंबईकरांचा बेफिकीरपणा, विनामास्क फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 4:26 PM

मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या महिन्याभरात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या दुप्पट झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे कोरोना काळातही मुंबईकरांची बेफिकीर वृत्ती समोर येत आहे. (Mumbai Without Masks Wearing People Number Increase)

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरात मुंबईत विनामास्क फिरणाऱ्या 3 लाख 59 हजार 384 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात त्यांच्याकडून 7 कोटी 28 लाख 63 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मुंबई महापालिकेने आतापर्यंत राबवलेल्या मोहिमेत एकूण 12 कोटी 95 लाख 57 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याशिवाय पालिकेने 10 नोव्हेंबरपर्यंत 2 लाख 70 हजार 232 मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 5 कोटी 66 लाख 93 हजार 600 कोटींचा दंड वसूल केला आहे.

मात्र सार्वजनिक ठिकाणी बेफिकीरपणे वागणाऱ्या मुंबईकरांमुळे गेल्या एका महिन्यात या दंडाच्या रकमेत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर वावरताना मास्कचा वापर करा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवरही कारवाई सुरू केली आहे. यात आतापर्यंत 6 हजार 587 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 12 लाख 87 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दरम्यान मुंबई कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईत सद्यस्थितीत 12 हजार 464 सक्रीय रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासात 680 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 90 हजार 023 इतकी झाली आहे. (Mumbai Without Masks Wearing People Number Increase)

(Mumbai Without Masks Wearing People Number Increase)

संबंधित बातम्या :

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाला कोरोनाचा फटका; सेवा शुल्क थकल्याने महसूल घटला

पुढच्या दोन दिवसात खान्देशात गारपीट, तर उत्तर कोकणात हलक्या सरींची शक्यता

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.