इतिहासात पहिल्यांदाच ‘राजभवन’मधून भाजप कार्यालय सुरू; नाना पटोलेंची खोचक टीका

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून सुरू असलेली टीका टिप्पणी अजूनही सुरूच आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. (nana patole)

इतिहासात पहिल्यांदाच 'राजभवन'मधून भाजप कार्यालय सुरू; नाना पटोलेंची खोचक टीका
Nana Patole
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 2:35 PM

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून सुरू असलेली टीका टिप्पणी अजूनही सुरूच आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राजभवनमधून भाजपचे कार्यालय सुरू असल्याची खोचक टीका नाना पटोले यांनी केली आहे. (nana patole taunt governor Bhagat Singh Koshyari over letter to cm uddhav thackeray)

नाना पटोले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधताना ही टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र दिले. त्याची दखल घेवून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राजभवनमधून भाजपचे कार्यालय चालत आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

निर्णय हायकमांड घेणार

यावेळी पटोले यांनी विधानसभा अध्यक्षापदाबाबतही भाष्य केलं. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील मुंबईत आहेत. ते राज्यातील काँग्रेसच्या आमदारांसोबत चर्चा करतील. त्यानंतर अध्यक्षपदाचं नाव हायकमांडकडे पाठवलं जाईल. त्यावर हायकमांड निर्णय घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तपास यंत्रणा बोथट होताहेत

अॅड. परमार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यावर आरोप केले होते. त्यावेळी ईडी किंवा सीबीआय आडवी येत नव्हती. फडणवीस त्यावेळी प्रत्येकाला निर्दोष असल्याचं सर्टिफिकेट देत होते, असं सांगतानाच सध्या मोदींचे सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून त्यांना बोथट करण्याचे पाप करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

वाझेप्रकरणात घटना तशाच कशा घडल्या?

यावेळी त्यांनी सचिन वाझे प्रकरणावरही मोठं भाष्य केलं. वाझे प्रकरणात जी स्क्रीप्ट फडणवीस यांनी वाचून दाखवली त्याच घटना कशा घडल्या? हे बीजेपीचे षडयंत्र होते का असे चित्र निर्माण झाले आहे. यावरून आम्ही भाजपाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करू, विरोधकांना त्याबाबतचा जाब विचारू, असं ते म्हणाले.

कृषी कायदा सार्वजनिक करा

शेतकरी कायदा विधीमंडळात आणण्यापूर्वी पब्लिक डोमेनमध्ये टाकावा जेणेकरुन शेतकऱ्यांना हवा तसा कायदा करता येईल अशी आमची मागणी राहील, असंही त्यांनी सांगितलं. (nana patole taunt governor Bhagat Singh Koshyari over letter to cm uddhav thackeray)

संबंधित बातम्या:

VIDEO: राज्यपालांना आम्हाला स्मरण करून द्यायची गरज काय?; ‘त्या’ पत्रावरून संजय राऊतांचा सवाल

ओबीसी आरक्षण राज्याच्या नव्हे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने रद्द; नवाब मलिकांचा राज्यपालांना टोला

केंद्राला काय करायचं ते करू द्या, शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

(nana patole taunt governor Bhagat Singh Koshyari over letter to cm uddhav thackeray)

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.