AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर नारायण राणेही आनंद दिघे मृत्यू प्रकरणावर बोलले!

मुंबई : खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी, शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांच्या मृत्यूप्रकरणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानंतर, आता निलेश राणे यांचेच वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी निलेश राणेंना तोंडघशी पाडले आहे. “दिघेंच्या मृत्यूबाबत होणाऱ्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करण्याचीही गरज नाही. यातलं वास्तव मी निलेशलाही सांगेन.” […]

अखेर नारायण राणेही आनंद दिघे मृत्यू प्रकरणावर बोलले!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

मुंबई : खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी, शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांच्या मृत्यूप्रकरणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानंतर, आता निलेश राणे यांचेच वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी निलेश राणेंना तोंडघशी पाडले आहे. “दिघेंच्या मृत्यूबाबत होणाऱ्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करण्याचीही गरज नाही. यातलं वास्तव मी निलेशलाही सांगेन.” असे नारायण राणे म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आनंद दिघे मृत्यूप्रकरणाबाबत भाष्य केले.

नारायण राणे काय म्हणाले?

नारायण राणे यांना आनंद दिघे मृत्यूप्रकरणी त्यांच्याच मुलाने म्हणजे माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर विचारले असता, ते म्हणाले, “विनाकारण चुकीच्या गोष्टीची साथ करणार नाही. दिघेंचा मृत्यू कुणी मारुन झालेला नाहीय. कारण दिघेंना त्या वेळेला शेवटचा भेटणारा मी होतो. मी तिथून निघाल्यानंतर काही क्षणातच त्यांचा प्राण गेला.”

नारायणे राणे पुढे म्हणाले, “मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांची (आनंद दिघे) परिस्थिती अतिशय गंभीर होती आणि डॉक्टर फार प्रयत्न करत होते. मी बाहेर येऊन बाळासाहेबांना फोन केला. म्हटलं, साहेब काही करा, पण डॉ. नितू मांडकेंना पाठवा. नितू मांडके जर आले तर काही करु शकतील. साहेबांनी नितू मांडकेंना सांगितलं. मांडके माझ्याशी बोलले. पण मांडके येण्याआधीच दिघे गेले होते. आता हे वास्तव आहे. हे सगळ्यांना सांगत बसलो नाही. मात्र जे आरोप आहेत, त्यात तथ्य नाही.”

तसेच, आता या प्रकरणावर (दिघे मृत्यू प्रकरणाचा वाद) पडदा पडला आहे. त्यावर चर्चा करण्याची गरज नाही. यातलं वास्तव मी निलेशला सांगेन, असेही नारायण राणे यांनी नमूद केले.

निलेश राणे काय म्हणाले होते?

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत कट रचून त्यांचा मृत्यू रुग्णालयात दाखवण्यात आला. तसंच याबाबत ज्या दोन शिवसैनिकांना माहिती होती, त्यांचाही बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन खून करण्यात आला, असं स्फोटक वक्तव्य निलेश राणे यांनी केलं होतं. काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंच्या 10 वर्षांच्या कारकीर्दीत कोकणात 9 खून पडल्याचा आरोप केला होता. त्यावरुन निलेश राणे यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केले. इतकंच नाही तर बाळासाहेब ठाकरेंनी गायक सोनू निगमलाही ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही निलेश राणे यांनी केला होता.

निलेश राणे यांचे आरोप जसेच्या तसे, त्यांच्याच शब्दात

“आम्ही आजपर्यंत एक मर्यादा पाळली. राणे साहेबांनीही पाळली. आम्ही कधी बाळासाहेबांबद्दल बोललो नाही. बाळासाहेबांनी काय काय केलंय, त्याबद्दल कधी बोललो नाही. कारण आम्हाला आमची मर्यादा माहित होती. आणि आमचे राणेसाहेब बाळासाहेबांवर आजही एवढे प्रेम करतात, की त्यांना ते कधी सांगता आलं नाही. पण एक मुलगा म्हणून, मी त्यांना साहेब जरी म्हणत असलो, तरी ते आधी माझे वडील आहेत. त्यांचा जाहीर कार्यक्रमात कुणी अपमान करत असेल, तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल.

आनंद दिघेंचं खरं काय झालं? कट कसा रचला गेला आणि त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आलं. आणि हे दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही. त्या शिवसैनिकांना ठार मारायाचा बाळासाहेबांनी कुणाला आदेश दिला आणि ते ठार झाले सुद्धा. ती केस दाबली गेली. जे दिघेसाहेबांबद्दल झालं, ते चुकीचं वाटलं शिवसैनिकांना म्हणून बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन त्या दोघांना ठार मारलं गेलं.

मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, मात्र राणेसाहेबांबद्दल जर कुणी खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल, तर मी सहन करणार नाही. माझ्यासाठी राणेसाहेब महत्त्वाचे आहेत, बाळासाहेब माझ्यासाठी महत्त्वाचे नाहीत. जेवढी मर्यादा आम्ही ठेवली होती, ती विनायक राऊतांनी त्या व्यासपीठावर ठेवली नाही.

त्याच्यानंतर सोनू निगमला ठार मारायचं होतं बाळासाहेबांना. अनेकवेळा सोनू निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले. तुम्ही त्यांना (सोनू निगम) विचारा, आज ते सांगतीलही. घाबरले असतील, मात्र, आज बाळासाहेब नाहीत, तर सांगतीलही. बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन कुठे कुठे सोनू निगमला ठार मारायला शिवसैनिक गेले होते. काय नातं होतं सोनू निगमचं आणि ठाकरे घराण्याचं, हे मला सांगायला लावू नका. जर माझं तोंड उघडायला लावाल, जाहीर सभेमध्ये सांगेन.

बाळासाहेबांच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर कुणा-कुणाचे मृत्यू झाले? कोण कोण गेलं कर्जतच्या फार्म हाऊसवर? हे सगळं जाहीर सभेमध्ये सांगेन. आमच्या नादाला लागायचं नाही. राणे म्हणतात आम्हाला. आजपर्यंत राणेसाहेब कधीही बोलले नाहीत. बाळासाहेबांनी केलं, त्यांचा मानसन्मान ठेवलाच पाहिजे. पण आमच्या राणेसाहेबांचा मानसन्मान कुणी ठेवायचा? बाळासाहेब बोलत होते, ते आम्हाला चालत होतं. आम्हाला काही फरक पडत नव्हता. पण असे गल्लीबोळातले गटरछाप (विनायक राऊत) बोलायला लागले, तर आम्ही गप्प बसायचं?

 कोण होते आनंद दिघे?

आनंद चिंतामणी दिघे हे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे धडाडीचे नेते होते. ‘धर्मवीर आनंद दिघे’ असे त्यांना संबोधले जाई. ठाणे जिल्ह्यावर आनंद दिघेंचं एकहाती वर्चस्व होते.

26 ऑगस्ट 2001 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आनंद दिघे यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाचा धक्का पचवता न आलेल्या कार्यकर्त्यांनी सुलोचनादेवी सिंघानिया हॉस्पिटल पेटवलं होतं. याच हॉस्पिटलमध्ये आनंद दिघे यांचं निधन झालं होतं.

आनंद दिघे यांच्यावर शिवसेना नेते श्रीधर खोपकर यांच्या हत्येचा आरोप होता. खोपकर यांनी 1989 साली काँग्रेसला मतदान केल्याचं बोललं जात होतं. दिघे यांना त्यावेळी टाडाअंतर्गत अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर जामिनावर सोडण्यात आलं. दिघे यांच्या निधनापर्यंत त्यांच्यावरील खटला सुरुच होता.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.