नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचं नाव द्या, पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांचं विधान भवन परिसरात आंदोलन

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणचा वाद तापलेला असताना विमानताला वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं या मागणीसाठी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज विधान भवन परिसरात दाखल झाले आहेत. | Navi Mumbai Airport

नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचं नाव द्या, पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांचं विधान भवन परिसरात आंदोलन
नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचं नाव द्या या मागणीसाठी पोहरादेवीचे महाराज महंत सुनिल महाराज विधान भवन परिसरात दाखल
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 11:59 AM

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणचा वाद तापलेला असताना विमानताला वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं या मागणीसाठी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज विधान भवन परिसरात दाखल झाले आहेत. सिडकोची संकल्पना ही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची होती. त्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी मागणी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी केलीय. (Navi Mumbai Airport name Vasantrao Naik demand Pohardevi Mahant Sunil Maharaj agitation in Vidhan Bhavan area mumbai)

नामकरण वादात बंजारा समाजाची उडी

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या विमानतळाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर ठाम आहे. आता नामकरण वादात बंजारा समाजाने उडी घेतली आहे.

महंत सुनिल महाराज यांच्या नेतृत्वात मुंबईत लक्षवेधी आंदोलन

बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज यांच्या नेतृत्वात मुंबईत लक्षवेधी आंदोलन करण्यात येतंय. मुंबईच्या विधानभवन परिसरात असलेल्या वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरु होतं. यावेळी विमानतळाला वसंतराव नाईक यांचं नाव दिलंच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणादून गेला होता. मात्र आंदोलनाची परवानगी नसल्याने पोलिसांनी त्यांची अडवणूक केली.

सिडकोची संकल्पना वसंतराव नाईक यांची, त्यामुळे विमानतळाला त्यांचं नाव द्यावं

नवी मुंबई आणि सिडकोची संकल्पना ही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची होती. त्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला द्यावे ही आमची मागणी असल्याचं पोहरादेवीचे महंत सुनील महाराज म्हणाले. आमची मागणी सरकारने मान्य करावी, अशी विनंती त्यांनी राज्य शासनाला केली.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरच्या मुद्द्यावर भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतंच राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी प्रशांत ठाकूर यांनी नवी विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. “नवी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी आमची जुनी मागणी आहे. या मागणीला घेऊन 24 जूनला आम्ही सिडकोला घेराव घालणार आहोत. या आंदोलनाची आणि आमच्या मागणीची राज ठाकरे यांना माहिती दिली, असं प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेची भूमिका स्पष्ट करताना विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं, अशी भूमिका मांडली.

(Navi Mumbai Airport name Vasantrao Naik demand Pohardevi Mahant Sunil Maharaj agitation in Vidhan Bhavan area mumbai)

हे ही वाचा :

बाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची आग्रही मागणी, रायगड ते नवी मुंबई मानवी साखळी

नवी मुंबई विमानतळासाठी महाविकासआघाडी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम; तर 18 गावांचा दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.