AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबई विमानतळ ते पुणे प्रवास होणार सोपा, ई-बस लवकरच सेवेत; प्रवासाचे तिकीट किती असणार?

नवी मुंबई विमानतळ ते पुणे प्रवास सोपा आणि सहज होणा आहे. यासाठी ई-बस लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. जाणून घ्या भाडे किती असणार.

नवी मुंबई विमानतळ ते पुणे प्रवास होणार सोपा, ई-बस लवकरच सेवेत; प्रवासाचे तिकीट किती असणार?
navi mumbai airportImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 06, 2026 | 11:25 AM
Share

मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातून वेगवेगळ्या भागात पोहोचणे सोपे होणार आहे. आता विमानतळावरून MSRTC च्या ई-शिवाई इलेक्ट्रॉनिक बस सुरू होणार आहे. या व्यतिरिक्त प्रवाशांना मोफत शटल आणि खासगी बसचाही लाभ मिळेल. विमानतळाच्या मुंबईतील पश्चिम आणि दक्षिण भागात जाणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाची ई-शिवाई इलेक्ट्रॉनिक बस सेवा 7 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू होणार आहे. या बसमुळे प्रवासी दादर पश्चिम, बोरिवली आणि पुण्याला जाण्याची सुविधा मिळेल. विमानतळावरून दादरला जाण्याचे तिकीट 170 रुपये असेल. तर बोरिवलीसाठी 210 रुपये आणि पुण्यासाठी 450 रुपये भाडे निश्चित करण्यात आलं आहे. दादरला जाणारी बस ही सायन आणि अटल सेतू मार्गे जाणार आहे. बोरिवलीची बस देखील अटल सेतूवरूनच जाईल.

महिला आणि विद्यार्थ्यांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत 

नवीन बस सेवेत काही प्रवाशांना भाड्यात सवलत मिळणार आहे. 12 वर्षांपेक्षा कमी वय आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डने प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटांच्या दरात 50 टक्के सूट देण्यात आली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना विमानतळापर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. या व्यतिरिक्त ठाणे, नाशिकसाठी देखील बस सेवा करण्याची योजना आहे. नवीन सेवा या नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई विमानतळापासून मुंबईला जाण्यासाठी विशेष बस सेवा 

नवी मुंबई विमानतळ ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी देखील एक सुविधा मिळणार आहे. दोन विमानतळाच्या दरम्यान दर तासाला मोफत शटल सेवा चालवण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त बेस्ट (Best) सेवा देखील उपलब्ध आहे. विमानतळाकडून अंधेरी पूर्व मरोळ, वांद्रे, दादर आणि कुलाबाच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दिशेने दररोज बस सेवा चालवण्यात येत आहे. याचबरोबर विमानतळापासून खारकोपर, तारघर, बेलापूर, नेरूळ, पनवेल आणि खांदेश्वरसहित विविध ठिकाणी जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे.

Follow Us
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार...
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी दिली माहिती
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी ट्विट करत दिली मोठी अपडेट
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर...
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर घणाघात; थेट म्हणाले...
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी