AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अत्यंत कमी दरामध्ये नवी मुंबईकर करू शकणार मेट्रोने ‘गारेगार’ प्रवास, जाणून घ्या तिकिट दर…

नवी मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. वाहतुक कोंडी आणि कमी पैशांमध्ये आता नवी मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे हा प्रवास एकदम फास्ट आणि गारेगार असणार आहे. मेट्रोने नवी मुंबईकरांना नवीन वर्षांचे गिफ्ट आताच दिले आहे.

अत्यंत कमी दरामध्ये नवी मुंबईकर करू शकणार मेट्रोने 'गारेगार' प्रवास, जाणून घ्या तिकिट दर...
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 9:26 AM
Share

मुंबई : नवी मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. वाहतुक कोंडी आणि कमी पैशांमध्ये आता नवी मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे हा प्रवास एकदम फास्ट आणि गारेगार असणार आहे. मेट्रोने नवी मुंबईकरांना (Navi Mumbai Metro ticket) नवीन वर्षांचे गिफ्ट आताच दिले आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत.

या तिकिटाची खास गोष्ट म्हणजे एनएमएमटी वातानुकूलित बसपेक्षाही मेट्रोचा तिकिट दर कमी आहे. यामुळे आता सर्वसामान्य लोकही मेट्रोने प्रवास करू शकणार आहेत. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी या मेट्रो प्रवासाच्या दराची घोषणा केली आहे. नवी मुंबई मेट्रोचा प्रकल्प 2011 मध्ये सुरू करण्यात आला होता. मात्र, त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले होते. यामुळे मेट्रो प्रकल्पाचे काम बरेच वर्ष रखडले होते. अनेक वर्षांपासून नवी मुंबईकर मेट्रोचा प्रवासाची वाट पाहात होते.

डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो सुरू करण्यासाठी सिडकोने प्रयत्न देखील सुरू केले आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर खरोखर मेट्रोचे काम वेगाने सुरू झाले. पेंधरपासून ते सेंट्रल पार्क दरम्यानच्या मार्गावर मेट्रोची चाचणी पूर्ण झाली आहे. नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा हा अकरा किलोमीटरचा आहे आणि याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. अशी माहीती डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली आहे. दर किलोमीटरच्या पुढे 40 रूपये मेट्रोचा दर ठेवण्यात आला आहे.

मेट्रोचे तिकिट दरपत्रक

0 ते 2 – 10

2 ते 4 – 15

4 ते 6 – 20

6 ते 8 -25

8 ते 10 -30

संबंधित बातम्या : 

डेटा गोळा करण्याबाबत आघाडी सरकारने टाळाटाळ केली तर भाजप आंदोलन छेडणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील 63 पैकी तब्बल 38 इमारतींना OC नाही, कारवाईची मागणी

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.