दिल्ली हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट: नवाब मलिक

दिल्ली हिंसेवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. (nawab malik slams bjp over farmers protest in delhi)

दिल्ली हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट: नवाब मलिक
नवाब मलिक
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 3:24 PM

मुंबई: दिल्ली हिंसेवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. (nawab malik slams bjp over farmers protest in delhi)

नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा गंभीर आरोप केला आहे. दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं. हा मोर्चा दिल्लीत आला. त्यांनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला. पण तिरंगा काढून त्यांनी ध्वज फडकवला ही बातमी चुकीची आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

लाल किल्ल्याच्या दिशेने शेतकऱ्यांची रॅली गेली होती. पोलिसांनीच त्यांना लाल किल्ल्याचा मार्ग दाखवला होता. तिथे ध्वज फडकवण्याचं काम भाजपशी संबंधित दीपसिंह सिद्धूने केली. याच दीपसिंह सिद्धूने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, असं सांगतानाच दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट होता, असा आरोपही त्यांनी केला.

पवार जवानांच्या बाजूने

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जवानांच्या बाजूने उभे आहेत. दिल्ली पोलीस दलात पंजाब, हरियाणाचे लोक आहेत, हे आशिष शेलार यांना माहीत नाही काय? असा सवालही त्यांनी केला.

दिल्ली हिंसेचे आझाद मैदानाशी कनेक्शन

दिल्लीतील हिंसाचारामागे आझाद मैदानातील भाषणाचं कनेक्शन असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी अमित शहा यांना पत्रं लिहून तसा आरोप केला आहे. तसेच दिल्लीतील हिंसाचाराचं आझाद मैदानातील भाषणाशी कनेक्शन आहे का? याची चौकशी करा, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. या सभेत सपा नेते अबू आझमी यांनी चिथावणीखोर भाषण केलं होतं. त्यामुळे आझमींचा बोलविता धनी कोण?, असा सवालही त्यांनी केला आहे. घर घर से बाहर निकलो, कोहराम मचा दो, मोदी तेरी राख कर देंगे, अशी वक्तव्य आझमीनी केली होती, असंही त्यांनी म्हटलं आहे. (nawab malik slams bjp over farmers protest in delhi)

संबंधित बातम्या:

आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण?; मिटकरींचा सवाल

दिल्ली हिंसाचारात ज्याचं नाव समोर येतंय तो लक्खा सिधाना कोण आहे?

लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी-शाहांवर घणाघात, आता शेतकरी आंदोलनावर राज ठाकरे काय बोलणार?

“हिंसाचारात भाजप सामील असल्याचा अपप्रचार, केंद्राला जबाबदार धरणं चुकीचं”

(nawab malik slams bjp over farmers protest in delhi)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.