AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळ यांचं मनोज जरांगे यांना खुलं आव्हान, म्हणाले, ‘विधानसभेला माझ्यासमोर येऊन उभं राहावं’

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठा ट्विस्ट येण्याची चिन्हं आहेत. कारण मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना येवल्यात येवून आपल्यासमोर उमेदवारी लढवण्याचं चॅलेंज दिलं आहे. त्यामुळे आता जरांगे काय भूमिका मांडतात? याकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.

छगन भुजबळ यांचं मनोज जरांगे यांना खुलं आव्हान, म्हणाले, 'विधानसभेला माझ्यासमोर येऊन उभं राहावं'
chhagan bhujbal and manoj jarange patilImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Sep 06, 2024 | 3:12 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद आता आणखी शिगेला पोहोचण्याची चिन्हं आहेत. कारण छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्यासमोर येवला मतदारसंघात उमेदवारी लढवण्याचं चॅलेंज दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने मराठा आरक्षणावर भूमिका मांडताना, आपली मागणी मान्य झाली नाही तर सत्ताधारी पक्षाचे आमदार पाडू, असा इशारा दिला जात होता. आपण मराठा समाजाचे उमेदवार विधानसभा निवडणुकीला उभे करु आणि सत्ताधाऱ्यांना सत्तेतून पायउतार करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात येत होता. मनोज जरांगे यांच्या या इशाऱ्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांना आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॉन्क्लेव्हमध्ये विचारण्यात आला. यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना आपल्या मतदारसंघात येऊन उमेदवारी लढवण्याचं आव्हान दिलं आहे. छगन भुजबळ यांचं हे आव्हान मनोज जरांगे पाटील हे स्वीकारतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

“अरे बाबा तू स्वत: माझ्यासमोर उभं राहयला ये. माझी इच्छा आहे. त्यांनी स्वत: माझ्यासमोर येऊन उभं राहावं”, असं आव्हान छगन भुजबळ यांनी दिलं. “भुजबळांना पाडलं तरी भुजबळांचा आवाज बंद होणार नाही. ओबीसींचं आरक्षण आणि संरक्षण करणं माझं काम आहे. सरकारमध्ये असो की बाहेर आवाज उठवणं हे भुजबळांचं काम आहे. या ५७-५८ वर्षात रस्त्यावर आणि सरकारमध्ये काम करण्याची सवय आहे. येवल्यात कोणीही या. भुजबळ लाख मते घेऊन विजयी होणार”, असा मोठा दावा छगन भुजबळ यांनी केला.

‘तुमच्या हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे करा’

“मनोज जरांगे यांनी रोज भूमिका बदलू नये. २८८ उमेदवार तुम्ही उभे करणार आहात. तुमच्या हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे करा. आमचं आव्हान आहे. प्रत्येकवेळी कशा बदलता? उपोषणाला बसतो म्हणतात आणि उठतो. मग म्हणतात मुस्लिमांना आरक्षण द्या. अहो मुस्लिमांना आम्ही आरक्षण दिलं. माहीत नसलेल्या गोष्टीवर ते बोलतात. अर्धवट माहिती असलेले लोक बोलतात. मध्यचे म्हणतात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार. अरे बाबा तुला काय करायचं ते कर. पण २८८ जागा लढवं”, असं आव्हान छगन भुजबळ यांनी दिलं.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.