महाविकासआघाडी सरकार लशींसाठी केंद्राला पैसे द्यायलाही तयार: नवाब मलिक

35 हजार कोटीची अर्थसंकल्पात तरतूद करुन केंद्राने ठरवले तर त्या पैशात देशातील लोकांना मोफत लस देता येईल. | Covid vaccine

महाविकासआघाडी सरकार लशींसाठी केंद्राला पैसे द्यायलाही तयार: नवाब मलिक
corona vaccines

मुंबई: देशातील दोन कंपन्या सोडून जगातल्या बर्‍याच कंपन्यांनी थेट राज्यांना लस देण्यास नकार दिला आहे. मात्र देशाची एक पॉलिसी ठरवावी आणि लस पुरवठा (Vaccine) करा अशी मागणी आधीपासूनच करत होतो. त्यामुळे आतातरी केंद्राने एक राष्ट्रीय पॉलिसी तयार करून ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले. (NCP leader Nawab Malik vaccine supply from central govt)

35 हजार कोटीची अर्थसंकल्पात तरतूद करुन केंद्राने ठरवले तर त्या पैशात देशातील लोकांना मोफत लस देता येईल.केंद्र सरकारने 18 ते 45 वर्षावरील लोकांची जबाबदारी राज्यांवर ढकलली आहे. केंद्राला पैसे अपेक्षित असतील तर त्यांनी पैसे जमा करा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो असे सांगावे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

आजही रेमडेसिवीर, म्युकरमायकोसिसची औषधे असतील किंवा इतर औषधे असतील ही सर्व औषधे राज्य सरकार पैसे देऊनच घेत आहे. केंद्र मोफत देत नाहीय असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

‘हवे तर पैसे देतो पण लस उपलब्ध करुन द्या’

याबाबत एक पॉलिसी ठरवून सगळी जबाबदारी घेऊन पैसे द्या आम्ही उपलब्ध करून देतो असे सांगावे. जर ही पॉलिसी ठरविण्यात आली नाही तर याचे पुरवठादार आहेत. ते ज्या राज्यांना जास्त पैसे देतील त्यांनाच देतील. काही राज्यांना पैसे देता येणार नाही ते वंचित राहतील, असेही नवाब मलिक म्हणाले.

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases in India) सलग चार दिवस घट झाल्यानंतर किंचितशी वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 12 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 8 हजार 921 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 8 हजार 921 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 157 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 95 हजार 955 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 71 लाख 57 हजार 795 वर गेला आहे. देशात 2 कोटी 43 लाख 50 हजार 816 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 11 हजार 388 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 24 लाख 95 हजार 591 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 20 कोटी 6 लाख 62 हजार 456 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

(NCP leader Nawab Malik vaccine supply from central govt)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI