भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे नेते लवकरच परततील: अजित पवार

भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे नेते लवकरच परततील: अजित पवार


मुंबई: “आमच्या पक्षातील निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकप्रतिनिधींना भाजपने आपल्या पक्षात घेतले. मात्र जे इतर पक्षात गेले आहेत त्यांची घरवापसी लवकरच होईल”,  असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. पाच राज्यांच्या निकालाने मोदी लाट ओसरल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं अजित पवार यांनी नमूद केलं.

पाच राज्यातील निकालने सिद्ध झाले आहे की, जनता आता यांना कंटाळली आहे. आता शहरी भागातील जनतेनेसुदधा यांना नाकारले आहे. या निकालमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, असं अजित पवार म्हणाले.

समविचारी पक्षांनी सोबत यावे ही आमची भूमिका आहे. प्रकाश आंबेडकर यांनाही सोबत घेण्याविषयी आम्ही आग्रही आहोत. मात्र त्यांना राष्ट्रवादीशी चर्चा करायची नाही. त्यांना काँग्रेसशी चर्चा करायची असेल तर नक्की करावी, मात्र प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यावे, असं अजित पवार म्हणाले.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले आहेत, ते लवकरच राष्ट्रवादीत परततील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले नेते कोण?

नंदुरबारचे आमदार विजयकुमार गावित, माजी मंत्री बबनराव पाचपुते, विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड यासारखी बडी नावं राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेली आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI