AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP MLA Disqualification | विधानसभा अध्यक्ष आणि दोन्ही गटाच्या वकिलांची जितेंद्र आव्हाड यांना तंबी, सुनावणीत जोरदार खडाजंगी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत अशा काही घडामोडी घडल्या ज्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि दोन्ही गटाच्या वकिलांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना तंबी द्यावी लागली.

NCP MLA Disqualification | विधानसभा अध्यक्ष आणि दोन्ही गटाच्या वकिलांची जितेंद्र आव्हाड यांना तंबी, सुनावणीत जोरदार खडाजंगी
| Updated on: Jan 24, 2024 | 11:11 AM
Share

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 24 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणीला सुरुवात झाली आहे. याप्रकरणी मंगळवारी (23 जानेवारी) प्रत्यक्ष सुनावणीचा पहिला दिवस होता. सुनावणीच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची फेरसाक्ष नोंदवण्यात आली. यावेळी जितेंद्र आव्हाड ठामपणे आपली भूमिका मांडत होते. पण यावेळी असं काही घडलं की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, दोन्ही गटाच्या वकिलांनी जितेंद्र आव्हाड यांना तंबी दिली. विशेष म्हणजे सुनावणीच्या पहिल्याच दिवशी दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि खटके उडाले.

नेमके सवाल-जवाब काय?

अजित पवार गटाचे वकील – आव्हाड तुमचे शिक्षण किती झालं आहे?

आव्हाड – BA झालं आहे, इतिहास आणि राजकारणात, मास्टर्स ऑफ लेबर स्टडीज झालं आहे आणि इतिहासात phd केलं आहे. पण याचा संबंध येतो कुठून?

वकील – तुम्ही वकिलीची परीक्षा पास झालात का?

आव्हाड – नाही

वकील – तुम्ही संविधानाचा अभ्यास केला आहेत का?

आव्हाड – थोडे वाचले आहेत

वकील – पार्टीचे नियम वाचले आहेत का?

आव्हाड – नाही

शरद पवार गटाचे वकील – माझा याला आक्षेप आहे

जितेंद्र आव्हाड – माझ्या प्रतिज्ञापत्रात हे देखील स्पष्ट केलं होतं. जी भाषण होतं होती ती सर्व मोदी सरकारच्या विरोधात होतं होती.

शरद पवार वकील – तुम्ही पॅराग्राफ 15 मध्ये नमूद केलं आहे की राष्ट्रीय अधिवेशन 11/9/2022 पार पडलं होतं

अजित पवार गटाचे वकील – तुमचं शिक्षण काय आहे?

आव्हाड – मी मरीन इंजिनियरिंग केलं आहे. मी बीए इतिहास आणि पॉलिटिक्समध्ये केलं आहे. माझं मास्टर्स इन लेबर स्टडी केलं आहे. त्यानंतर मी मुंबई विद्यापीठातून पीएचडी केली आहे. पण हे माझ्या प्रतिज्ञापत्राशी संबंधित नाही

अजित पवार वकील – तुम्ही एलएलबी केलं आहे का? तुम्ही संविधान वाचलं आहे का? तुम्ही पक्षाचे नियम वाचले आहेत का?

आव्हाड- मी एलएलबी केलं नाही. मी संविधानाच्या काही बाबी वाचल्या आहेत. मी पक्षाचे नियम वाचले नाहीत.

वकील – तुमच्या पार्टीचे स्ट्रक्चर काय आहे?

आव्हाड – जिल्हा कमिटी, राज्य कमिटी, राज्य स्तरीय ऑफिस बेरर आणि त्या पक्षाचे अध्यक्ष. प्रत्येक राज्य अध्यक्ष डिलेगीटची नवं, रिटर्निंग ऑफिसरला नॅशल कानवेन्शनला पाठवतो आणि ते नॅशनल अध्यक्ष ठरवतात.

अजित पवार वकील – पंचायत कमिटी आहेत की ब्लॉक कमिटी आहेत?

आव्हाड – मी त्याचा उल्लेख केला आहे. वेगवेगळी नावं आहे. शेवटच्या स्थरावरून पहिल्या स्थरापर्यंत निवडणूका घेतल्या जातात. निवडणुका आजपर्यंत घेतल्या गेल्या आहेत, त्या घेतल्या जातात.ही माहिती पक्षाचे माजी अध्यक्ष सुनील तटकरे 2015 आणि 2018 ला निवडणूका झाल्या ही माहिती त्यांनी वकिलांना द्यायला हवी होती, म्हणजे हा प्रश्नाच उद्भवला नसता.

अजित पवार गटाकडून आक्षेप – जितेंद्र आव्हाड यांनी साक्ष देत असताना प्रतिज्ञापत्र व्यतिरिक्त इतरही कागदपत्रे सोबत ठेवली होती. विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीशिवाय इतर कोणतेही कागदपत्रे सोबत ठेऊ शकत नाही. अजित पवार गटाकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे.

आव्हाड – ब्लॅाक, तालुका, जिल्हा, राज्य, डेलिगेट्स, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणी, सेंट्रल वर्किंग कमीटी (हरारकी). सुनील तटकरे हे आमचे राष्ट्रीय सरचिटणीस होते आणि ट्रेजरर

वकील – ब्लॅाक कमिटी आणि तालुका समिती सारखीच आहे का? मी राज्य निवडणूक समितीमध्ये नाही.

आव्हाड – त्यामुळे मला या संदर्भातील पूर्ण माहिती देता येणार नाही

वकील – पंचायत, ब्लॅाक, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय कमिटीची नियुक्ती कशी केली जाते?

आव्हाड – मला माहिती नाही

शरद पवार गटाचे वकील यांनी आक्षेप घेतला

शरद पवार गटाचे वकील – जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आलेल्या राष्ट्रीय कर्यकरणीबाबतच्या प्रश्नांची शृंखला ही विधानसभा अध्यक्षांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचा आहे. कारण त्यात पक्षाच्या संघटनेबद्दल प्रश्न विचारले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुभाष देसाई केसमध्ये १६७ परिषदेत सांगितले आहे.

अजित पवार गटाचे वकिल यांनी आक्षेपाला उत्तर दिलं

अजित पवार गटाचे वकील – अध्यक्षांना कोणता पक्ष आहे हे आणि कोणत्या पक्षाला किती पाठिंबा आहे हे बघायचे आहे आणि कोणता पक्ष आहे हे ठरवायचे आहे. आपण निवडणूक आयोगापुढे असलेल्या संरचनात्मक फुटीबद्दल ठरवायचे नाही. या गटाला संघटनात्मक पाठिंबा नाही हे सिद्ध करण्यासांठी, ते पक्षाच्या घटनेच्यानुसार आहेत का नाही? हे बघायचे आहे. ज्याची भिस्त ही संघटनेवर अवलंबून आहे.

अजित पवार गटाचे वकील – जिल्हा आणि राज्यस्तरीय कमिटी निवडणूक झाल्या होत्या का?

आव्हाड – माझ्या माहितीनुसार निवडणुका झाल्या होत्या. माझ्या माहितीनुसार निवडणुकांबाबतची माहिती एका कपाटात बंद होती. पण ती आता गहाळ झालीत. जे लोक सोडून गेलेत त्यांच्याकडे हे होतं. त्यांनी पुढे काय केलं ते माहिती नाही.

आव्हाड भर सुनावणीत जोरात ओरडले आणि….

अजित पवार गटाचे वकील : शरद पवार यांनी २ मे २०२३ रोजी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता का?

जितेंद्र आव्हाड : त्यांनी इच्छा व्यक्त केली. पण राजीनामा दिला नाही. तेव्हा छगन भुजबळ साहेब हजर होते. तेव्हा ते म्हणाले की, साहेब तुम्हीच आमची कमिटी आहात. तुमच्याशिवाय आम्ही आमच्या राजकीय भविष्याचा विचार करू शकत नाहीत.

जितेंद्र आव्हाड सभागृहात जोरात माईकवर ओरडले. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी आव्हाडांना समज दिली. यावेळी अजित पवार गट वकील आणि आव्हाड आमनेसामने आले. शरद पवार गटाच्या वकिलांनी सुद्धा आव्हाडांना समज दिली. जे प्रश्न विचारले जातात आहेत त्यावर ऐकून हळू उत्तर द्या, अशी तंबी जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आली.

आव्हाड : वकिलांना मी सांगू इच्छितो की अनिल पाटील मोठमोठ्याने सांगत होते की तुम्ही जर राजीनामा देणार असाल तर मी ही माझ्या विधानसभा सदस्यात्वाचा राजीनामा देतो. हेच वाक्य पुढे त्यांनी प्रेसला सांगितले. जयंत पाटील आले. त्यांच्या डोळ्यात पाणी होते आणि ते साहेबांजवळ जाऊन म्हणाले की, साहेब मी राजकारणात आलो तेच तुम्हाला बघून. तुम्ही असा निर्णय कसा काय घेता तो तुम्हाला घेता येणार नाही. तिथे उपस्थित असेल्यांनी सभागृहात प्रचंड आरडाओरड सुरू केली. ते सांगू लागले की तुम्ही जाऊ शकत नाही. मी बोललो साहेब मी माझ्या यौवनातला काळ तुमच्या बरोबर होतो. मी दुसरे दार पाहीलेच नाही. तुमचा निर्णय तुमचा असू शकत नाही. तुमचा तुमच्यावर जितका अधिकार आहे त्यापेक्षा जास्त आमचा तुमच्यावर अधिकार आहे. अख्या सभागृहाची हीच भावना होती.

वकील : तुमचं म्हणणं आहे का शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा?

आव्हाड : त्यांनी शब्दातून कृती करणार असं म्हटलं. याचवेळी सगळीकडून आवाज उठला. याच वेळी भाषण दरम्यान त्यांनी १७ जणांची कमिटी स्थापन केली. ही कमिटी काही पर्याय दिसत आहेत का? याबद्दल निर्णय देणार होती.

वकील : शरद पवार यांनी राजीनामा देणार असल्याचं त्यांनी स्वतः ठरवलं होते? ( अशी मानसिकता तयार केली होती) असं तुम्ही म्हटलं आहे. याचा अर्थ काय घ्यायचा?

आव्हाड : त्यांनी शब्दातून कृती करणार असं सांगितलं होते. पण कृती केली नव्हती. या कमिटीत एकमताने १७ जणांनी ठरवलं. या कमिटीने एका ओळीचा ठराव मंजूर केला की शरद पवार यांनीच पुढे अध्यक्षपदी कायम राहावं असं ठरलं! जे सदस्य याचे सदस्य होते. यामध्ये महत्वाची भूमिका अजित पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल आणि अन्य ज्यांनी पक्ष सोडला त्यांची होती

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.