नवी मुंबई एपीएमसीत कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, शहरातील बाधितांचा आकडा 289 वर

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगान वाढत आहे (New Mumbai Corona Update). नवी मुंबईत शनिवारी (2 मे) दिवसभरात तब्बल 39 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले.

नवी मुंबई एपीएमसीत कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, शहरातील बाधितांचा आकडा 289 वर

नवी मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगान वाढत आहे (New Mumbai Corona Update). नवी मुंबईत शनिवारी (2 मे) दिवसभरात तब्बल 39 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यापैकी 10 रुग्ण हे नवी मुंबई एपीएमसी मार्केटशी संबंधित आहेत. त्यामुळे एपीएमसी मार्केटमधील कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 289 वर पोहोचली आहे. यामध्ये एपीएमसीतील 48 रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे (New Mumbai Corona Update).

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आता कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. या एपीएमसीतील भाजी मार्केटमध्ये काल 6, फळ मार्केटमध्ये 2 आणि धान्य मार्केटमध्ये 2 असे एकूण 10 नवे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. एपीएमसीतील कोरोना रुग्णांची संख्या आता 48 वर पोहोचली आहे.

एपीएमसी प्रशासनाकडून कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि मार्केटमध्ये वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय कामगारांची कोरोना चाचणी न झाल्याने मार्केट परिसरात भीतीचे वातावरण आहे. मात्र, एपीएमसीतून जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात असल्याने आवश्यक ती काळजी घेऊन बाजार सुरुच राहणार, असं एपीएमसी प्रशासनाने सांगितलं आहे.

एपीएमसीत भाजीपाला मार्केटमध्ये कोरोनाबाधित व्यापाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 6 जणांचा रिपोर्ट काल कोरोना पॉझिटिव्ह आला. तर धान्य मार्केटमध्येही कोरोनाबाधित व्यापाऱ्याच्या संपर्कात आल्याने 2 जणांना कोरोनाची लागण झाली. तसेच फळ मार्केटमध्ये कोरोनाबाधित सुरक्षा अधिकारी आणि व्यापाऱ्याच्या संपर्कात आल्याने दोघांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाचा हा विळखा इतका घट्ट झाला की, भाजीपाला व्यापाऱ्याच्या कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली.

घणसोलीत कोरोनाबधित फार्मासिस्टच्या संपर्कात आल्याने 5 जणांना कोरोनाची लागण झाली. तर नेरुळ येथील बेस्ट बस कंडक्टरचा रिपोर्ट कोरोना पॉझिटव्ह आला. ऐरोली येथे मुंबई पोलीस दलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्याने दोघांना कोरोनाची लागण झाली. तसेच नवी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

जुईनगरमध्ये राहणाऱ्या बांद्रा बिकेसी येथील एका 55 वर्षीय भाजीपाला व्यापाऱ्याचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे रिपोर्ट पॉझिटिव आल्याने त्याच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. दरम्यान, नवी मुंबईत काल वाशीमध्ये 3, तुर्भेमध्ये 4, नेरुळमध्ये 6, कोपरखैरणेत 8, घणसोलीमध्ये 12, ऐरोलीत 3, तर दिघा येथे 3 नवे रुग्ण सापडले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

संबंधित बातम्या :

Corona Update : महाराष्ट्रात दिवसभरात 790 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, आकडा 12,296 वर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI