सचिन वाझेंना घेऊन NIA टीमचा लोकल ट्रेनने प्रवास; CSMT आणि कळवा स्थानकात क्राईम सीन रिक्रिएट

रात्री 12.15च्या लोकल ट्रेनने NIA ची टीम सचिन वाझे यांना घेऊन कळव्याच्या दिशेने निघाली. | Sachin Waze NIA

सचिन वाझेंना घेऊन NIA टीमचा लोकल ट्रेनने प्रवास; CSMT आणि कळवा स्थानकात क्राईम सीन रिक्रिएट
सचिन वाझेंना घेऊन एनआयए सीएसएमटी स्थानकात

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे (Sachin Waze) यांना घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) अधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबईतील लोकल ट्रेनने (Local Train) प्रवास केला. 4 मार्च रोजीच्या घटनांचे नाट्यरुपांतरण करण्यासाठी सचिन वाझे यांना छत्रपती शिवाजी महाराज (CSMT) आणि कळवा रेल्वे स्थानकात नेण्यात आले होते. (Sachin Waze and NIA officers travelling by Mumbai Local train)

रात्री साधारण सव्वाअकराच्या सुमारास NIA चे अधिकारी वाझे यांना घेऊन मुंबईतील कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर साडेअकरा वाजता हे सर्वजण सीएसएमटी स्थानकात दाखल झाले. याठिकाणी फलाट क्रमांक 4 आणि 5 वर सचिन वाझे यांना नेऊन 4 मार्चच्या रात्री काय घडले होते, याची नेमकी माहिती ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार साचिन वाझे यांनी 4 मार्च रोजी CSMT ते कळवा हा प्रवास लोकल ट्रेनने केला होता. त्यामुळे रात्री 12.15च्या लोकल ट्रेनने NIA ची टीम सचिन वाझे यांना घेऊन कळव्याच्या दिशेने निघाली. साधारण 12.45 च्या सुमारास लोकल ट्रेन कळव्याला पोहोचली. याठिकाणी उतरल्यानंतर NIAच्या अधिकाऱ्यांनी 30 मिनिटं थांबून 4 मार्चच्या रात्री घडलेल्या घटनांचे नाट्यरुपांतरण (क्राईम सीन रिक्रिएट) केले. हे सगळं आटोपल्यानंतर NIAची टीम रात्री सव्वाच्या सुमारास सचिन वाझे यांना घेऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाली. रात्री दोन वाजता हे सर्वजण पुन्हा मुंबई NIAच्या कार्यालयात पोहोचले.

NIAच्या हाती आणखी एक CCTV फुटेज

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार NIA च्या हाती आणखी एक सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. त्यामध्ये साचिन वाझे यांनी 4 मार्च रोजी CST ते कळवा प्रवास केला होता. यापूर्वी सचिन वाझे यांना घेऊन NIA ने अँटलिया आणि अन्य परिसरात क्राईम सीन रिक्रिएट केले आहेत. या माध्यमातून NIA अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे.

कार संपल्या, वाझे प्रकरणात आता स्पोर्टस बाईकची एन्ट्री

अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) सचिन वाझे यांच्या सुरु असलेल्या चौकशीत आणखी चक्रावणारी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत याप्रकरणात अनेक कारचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आता याप्रकरणात स्पोर्टस बाईकची एन्ट्री झाली आहे.

ही स्पोर्टस बाईक मीना जॉर्ज यांच्या नावावर आहे. दमणमधून ही बाईक एनआयएने जप्त केली. ही स्पोर्टस बाईक बेनेली कंपनीची आहे. या स्पोर्टस बाईकची किंमत जवळपास 7 लाख 16 लाख इतकी आहे. काही दिवसांपूर्वी एनआयएने मीना जॉर्ज यांना ताब्यात घेतले होते. ट्रायडंट हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मीना जॉर्ज सचिन वाझे यांच्यासोबत दिसून आल्याचे सांगितले जाते. त्यावेळी त्यांच्या हातात पैसे मोजण्याचे मशीन होते, असेही सांगितले जाते.

संबंधित बातम्या:

ना वाझेंशी भेट, ना अँटिलिया स्फोटक कटात सहभाग, यूपीच्या बड्या गँगस्टरने आरोप फेटाळले

मिठी नदी 18 किमी लांब, तिथेच वस्तू कशा सापडल्या, वाझे-NIA चं कोर्टात घमासान, 26 लाखांपैकी 5 हजारच खात्यात शिल्लक

सचिन वाझे केस : मीना जॉर्जच्या नावे मीरा रोडमध्ये फ्लॅट भाड्याने, 13 तासांच्या तपासानंतर NIA महिलेसह मुंबईला रवाना

(Sachin Waze and NIA officers travelling by Mumbai Local train)

Published On - 7:23 am, Tue, 6 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI