AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रविवारी नऊ तासांचा मेगाब्लॉक, पुणे, नाशिककडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेवर मुंबईत रविवारी (20 जानेवारी)  तब्बल नऊ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. परळ रेल्वे स्थानकाजवळ यार्ड रिमोल्डिंग, प्लॉट फार्म दुरुस्ती आणि सिग्नल प्रणाली अत्याधुनिक करण्याबरोबरच इतर दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे […]

रविवारी नऊ तासांचा मेगाब्लॉक, पुणे, नाशिककडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द
लोकल ट्रेन
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM
Share

मुंबई : मध्य रेल्वेवर मुंबईत रविवारी (20 जानेवारी)  तब्बल नऊ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. परळ रेल्वे स्थानकाजवळ यार्ड रिमोल्डिंग, प्लॉट फार्म दुरुस्ती आणि सिग्नल प्रणाली अत्याधुनिक करण्याबरोबरच इतर दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

या मेगाब्लॉकमुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर आणि नाशिक-पुण्याकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे. रेल्वेकडून काही महत्त्वाच्या गाड्या या मेगाब्लॉक दरम्यानर रद्द केल्या आहेत.

रेल्वेकडून रद्द करण्यात आलेल्या गाड्या

  • मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस (२२१०२ अप)
  • मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस (२२१०१ डाऊन)
  • मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस (१२११० अप)
  • मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस (१२१०९ डाऊन)
  • पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस (११०१० अप)
  • मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस (११००९ डाऊ)
  • पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (१२१२४ अप)
  • मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस (१२१२३ डाऊन)

रविवारी सुट्टीमुळे  अनेकजण फिरण्यासाठी घराबाहेर  जातात. मात्र या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. विशेष म्हणजे मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही याचा फटका बसणार आहे. मुंबईवरुन नाशिक-पुण्याकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

Follow Us
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू