AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण नाही; सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून तोडगा काढणार; नितीन राऊतांचे अश्वासन

जवळपास 36 वीज कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चेत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना संप मागे घेण्याची विनंतीही करण्यात आली. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगण्यात आले की, वीज कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राला वेठीस धरू नये अशीही विनंती करण्यात आली.

वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण नाही; सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून तोडगा काढणार; नितीन राऊतांचे अश्वासन
नितीन राऊत Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 4:00 PM
Share

नागपूरः राज्यात सध्या उष्णता वाढली असून विजेची मागणी (Demand for electricity) मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. एकीकडे राज्यात प्रचंड उष्णता वाढली तर दुसरीकडे महत्वाचे म्हणजे दहावी-बारावीचे परीक्षाही सुरु झाली आहे. शेतामध्ये व पीक असल्याने सिंचनाची गरज असल्याच माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली. त्यानंतर जवळपास 36 वीज कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video conference) चर्चेत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना संप मागे घेण्याची विनंतीही करण्यात आली. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगण्यात आले की, वीज कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राला वेठीस धरू नये अशीही विनंती करण्यात आली.

तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले की अशा परिस्थितीत महावितरण आर्थिक संकटात असताना वीज कर्मचाऱ्यांनी राज्याला वेठीस धरू नये आणि वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आली.

संघटनांबरोबर चर्चा करणार

वीज कर्मचाऱ्यांना विनंती करण्यात आल्यानंतर त्यांना सांगण्यात आले की, उद्या मुंबईत समोरासमोर बसून चर्चा करु असंही त्यांनी सांगितले आहे. कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर ऊर्जा मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नितीन राऊत यांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपल्याला खात्री आहे की, सर्व संघटना याबद्दल सकारात्मक विचार करतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

कंपनीचे खासगीकरण नाही

तसेच महामंडळ खासगीकरणाची जी गोष्ट आहे, त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, खासगीकरण अजिबात कोणत्याही कंपनीचा होणार नसल्याचेही त्यांनी खात्री दिली आहे. यावेळी त्यांनी वीज निर्मितीविषयी सांगताना म्हटले की, या सर्व गोष्टींचा वीज निर्मितीवर निश्‍चितपणे परिणाम होणार आहे. एकादा प्लांट बंद झाला तर विजेच्या ग्रीडवर त्याचा परिणाम होतो असेही त्यांनी सांगितले. एकलहरे वीज प्रकल्पातील दोन प्लांट बंद झाल्यामुळे नाशिक परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. सध्याच्या काळात कोळशाचे मोठे संकट आमच्यापुढे उभा राहिले असून या परिस्थिती कर्मचाऱ्यांनी राज्याला वेठीस धरणे चुकीचे आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा अशी विनंतीही त्यांनी केली.

एक पाऊल मी पुढे येतो एक पाऊल तुम्ही या…

राज्याला सध्या विजेची नितांत गरज असून या परिस्थितीचा फायदा कुणीही घेऊ नये असेही त्यांनी सांगितले. तसेच कृपया कोणत्याही संघटनेने राज्य सरकारला वेठीस धरू नये आणि विरोधकांना संधी उपलब्ध करून देऊ नये असेही त्यांनी सांगितले. या परिस्थितीचा विचार करुन ऊर्जा मंत्री राऊत यांनी सांगितले की, एक पाऊल मी पुढे येतो एक पाऊल तुम्ही समोर या असेही अश्वासन त्यांनी दिले.

वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा आहे

वीज प्रकल्पांतील कोळशाच्या तुटवड्याची परिस्थितीही त्यांनी सांगितली. यावेळी त्यांनी सांगितले की, वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा आहे, ही बाब सत्य आहे. अधिकारी सध्या कोळशा कंपनीच्या पिट्स वर बसून असून निघणारा कोळसा लगेच वीज प्रकल्पामध्ये पाठवत आहेत, तरीपण अनेक प्रकल्पांमध्ये दीड आणि दोन दिवसांचाच साठा पुरेल इतका साठा असल्याची माहितीही त्यांनी दिली.

अनेक राज्यात वीज पुरवठ्याची समस्या

वीज महामंडळाची परिस्थिती ही फक्त महाराष्ट्रातच आहे असे नाही तर अनेक राज्यात वीज पुरवठ्याची समस्या आहे. महावितरण ही सेवा करणारी कंपनी आहे मात्र, ग्राहकांनी विजेचा वापर करताना बिल भरणेही आवश्यक आहे. वीज बिल भरणे हे ग्राहकांचेही कर्तव्य होते मात्र ही वीज बिल वेळेवर भरण्यात आले नाही. ग्राहकांकडून वीज बिल वेळेवर भरले गेले असेल तर महावितरणवर आर्थिक संकट ओढवणार नाही असेही मत त्यांनी व्यक्त केले. महामंडळावर हे संकट आले असले तरी आम्ही या संकटातून नक्कीच बाहेर पडू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वीज संघटनांनी अश्वासन दिले

नितीन राऊत यांनी कर्मचाऱ्यांच्या संपावर बोलताना सांगितले की, उद्या सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारनियमानंसारखी परिस्थिती राज्यावर येऊ देणार नाही असे आश्वासन वीज संघटनांनी मला दिले आहे अशी माहितीही नितीन राऊत यांनी सांगितले.

ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसह राज्याच्या प्रधान सचिवांनी ही वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत चर्चा केली होती, मात्र काही प्रमाणात गैरसमज असला तरी उद्या होणाऱ्या चर्चेतून सगळ्या समस्या दूर होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

राजीनामा मागणारे विरोधक आणि राजीनामा देणारे सत्ताधारी अधिवेशनात हेच दिसलं, Pankaja Munde यांची टीका

शरद पवार, रामराजे यांच्या समोर हरलो नाही, आंडू पांडूनी नाद करु नये : रणजीतसिंह नाईक निंबाळकर

Navi Mumbai : आमदार प्रशांत ठाकुरांना धक्का, पत्नीच्या नावे असलेला 300 कोटींचा भूखंड रद्द, राज्य विरुद्ध भाजप संघर्ष की विमानतळ नामकरणाचा वचपा?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.