AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मी मुंबईकरांची माफी मागतो” अमित ठाकरेंनी खडे बोल सुनावताच भावेश कावरे वठणीवर, काय म्हणाला?

Amit Thackeray Bhavesh Kaware : 'मांसाहारींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत' अशी डिवचणारी जाहिरात करणारा भावेश कावरे चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्याच्या या जाहिरातीवर संतापाची लाट उसळल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी त्याला बोलावून घेतले. त्याचे कान टोचले. त्यानंतर तो लागलीच वठणीवर आला. काय म्हणाले कावरे?

मी मुंबईकरांची माफी मागतो  अमित ठाकरेंनी खडे बोल सुनावताच भावेश कावरे वठणीवर, काय म्हणाला?
अमित ठाकरे, मनसे, भावेश कावरेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Aug 16, 2026 | 9:42 PM
Share

मुंबईतील ताडदेव येथील एका घराच्या संदर्भात ‘मांसाहारींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत’ अशी डिवचणारी जाहिरात केल्यानंतर भावेश कावरे चांगलाच अडचणीत सापडला. या जाहिरतीमुळे सोशल मीडियावर सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्याच्याविरोधात संतापाची भावना होती. त्याने ही जाहिरात का केली याचे स्पष्टीकरण करणारा व्हिडिओ शेअर केला होता आणि दिलगिरी व्यक्त केली होती. या वादानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी त्याला बोलावून घेतले. त्याला या प्रकाराबद्दल जाब विचारला. त्यांनी त्याचे चांगलेच कान पिळले. त्यानंतर कावरे वठणीवर आला.

अमित ठाकरे यांनी विचारला जाब

तू जे बोललास ते अत्यंत चुकीचे आहे. लोक आता मुंबईतील अडचणीवर बोलायला लागले आहेत. त्यांचं लक्ष त्यावर केंद्रित होत असताना तू असं बोलतोस, तू त्यांना भरकटवतोस असा जाब अमित ठाकरे यांनी भावेशला विचारला. थोड्याशा प्रसिद्धी आणि पैशांसाठी तू उगाच ताण निर्माण केलास. भावेश, तुला माहिती तू, चांगलं काम करत होता, तेव्हा मीच तुला बोलावलं होतं. मग तुला कुठं कोणत्या गोष्टी सोडायला हव्यात हे तुला कळयाल हवं, असे खडे बोल अमित ठाकरे यांनी भावेश कावरे याला सुनावले. आता तू कव्हर अप करायला रील्स तयार करतोय. पण ही चूक तू अगोदरच होऊ द्यायची नव्हतीस. कुठे कुणाच्या धर्मावर, जातीवर जायचं नाही. अशा मुलांचा वापर काही लोक भरकटवण्यासाठी करतात. आमची रस्त्यावर मोठी ताकद आहे. तू आज सगळ्यांची माफी माग असे अमित ठाकरे यांनी त्याला सुनावले.

मी मुंबईकरांची माफी मागतो

अमित ठाकरे यांनी खडसावल्यानंतर या वादग्रस्त जाहिरातीविषयी भावेश कावरे याने माध्यमांसमोर येत माफीनामा दिला. मी मुंबईकरांची माफी मागतो. कुणाचं मन दुखावलं असेल तर माफी मागतो. भावेश कावरे. मी मुंबईकरांची आणि मनसे, अमित ठाकरे यांची माफी मागतो. मला पुढे वाद वाढवायचा नाही. मी मराठी माणसाला घर देत आहे. त्यांना घर देत राहणार. ही जाहिरात केल्यानंतर इतका वाद होईल असं काही वाटलं नव्हतं. पण तरीही भावना दुखावल्या असतील तर मी मुंबईकरांची माफी मागतो असे भावेश म्हणाला.

तीन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल

भावेश कावरे याने आज अमित ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे यांनी भावेशवर संताप व्यक्त केला. भावेश याने अमित ठाकरे आणि मराठी लोकांची यावेळी माफी मागितली. मात्र अमित ठाकरे आणि भावेश कावरे याचा तीन वर्षे जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेच्या कार्यक्रमात भावेश कावरे आला असतानाचा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाला कंटेन्ट क्रिएटरचा सत्कार मनसेकडून करण्यात आला होता. यावेळचा अमित ठाकरे आणि भावेश कावरे यांचा व्हिडिओ वायरल होत आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी