मराठा समाजापाठोपाठ ओबीसींचाही मोर्चा; 15 जून रोजी राज्यव्यापी आंदोलन

खासदार संभाजी छत्रपती यांनी येत्या 16 जून रोजी मराठा मोर्चाची हाक दिलेली असतानाच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी येत्या 15 जून रोजी ओबीसी मोर्चाची हाक दिली आहे.

मराठा समाजापाठोपाठ ओबीसींचाही मोर्चा; 15 जून रोजी राज्यव्यापी आंदोलन
प्रकाश शेंडगे, ओबीसी नेते
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 11:02 AM

मुंबई: खासदार संभाजी छत्रपती यांनी येत्या 16 जून रोजी मराठा मोर्चाची हाक दिलेली असतानाच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी येत्या 15 जून रोजी ओबीसी मोर्चाची हाक दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर शेंडगे यांनी मोर्चाची हाक दिल्याने या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (obc leader prakash shendge declare OBC Morcha on 15th June)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मंगळवारी पंतप्रधा नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींकडे मराठा आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षणासह ओबीसींच्या आरक्षणावरही चर्चा केली. त्यानंतर प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी मोर्चाची हाक दिली आहे. एक डेडिटकेटेड आयोग नेमून ओबीसींचा डाटा गोळा करावा. त्यानंतर हा डाटा सुप्रीम कोर्टाला सादर करावा. तरच ओबीसींचे आरक्षण टिकेल. सरकारला हे आरक्षण टिकवता आलं नाही तर येत्या 15 तारखेला ओबीसी समाज रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करेल. याची जबाबदारी सरकारचीच असेल, असा इशारा शेंडगे यांनी दिला.

मराठा आरक्षण मोर्चा कधी?

दरम्यान, संभाजीराजेंनीही रायगडावरून मराठा आंदोलनाची घोषणा केली आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत. 16 जून रोजी हा मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा करतानाच आधीचं आणि आजचं सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका. मी संयमी आहे. त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही माझा संयम पाहिला. आता संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी छत्रपती यांनी दिला होता.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल पंतप्रधानांना भेटले होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या भेटीची माहिती दिली. या भेटीत मराठा आरक्षणापासून ते अगदी मुंबई मेट्रोसाठी कांजूरमार्गच्या जागेपर्यंत आणि जीएसटीचा परतावा, पिक विमा, नैसर्गिक आपत्ती आल्यानंतरची मदत, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. भेटीनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांनी भेटीचा तपशील माध्यमांसमोर मांडला. (obc leader prakash shendge declare OBC Morcha on 15th June)

संबंधित बातम्या:

धनगर आरक्षण न मिळाल्यास सरकारला सळो की पळो करु, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा

खासदार संभाजी छत्रपतींची रायगडावर घोषणा, पहिला मराठा मोर्चा 16 जूनला; ठिकाणही ठरलं

मराठा आरक्षणासोबत मुस्लीम आरक्षणाचाही अध्यादेश काढा, काँग्रेसच्या माजी आमदाराची अशोक चव्हाणांना मागणी

(obc leader prakash shendge declare OBC Morcha on 15th June)

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.