AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Virus | टॅक्सीचालकाच्या संपर्कातील 7-8 जणांची तपासणी, त्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा : अजित पवार

पुण्यातील दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासन आणखी सतर्क झालं आहे. आतापर्यंत 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर (Ajit Pawar on Pune Coronavirus Ola driver) आलं आहे.

Corona Virus | टॅक्सीचालकाच्या संपर्कातील 7-8 जणांची तपासणी, त्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा : अजित पवार
| Updated on: Mar 11, 2020 | 10:41 AM
Share

मुंबई : पुण्यातील दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासन आणखी सतर्क झालं आहे. आतापर्यंत 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर (Ajit Pawar on Pune Coronavirus Ola driver) आलं आहे.  पुण्यातील दाम्पत्याच्या मुलीला, नातेवाईकाला आणि ते ज्या टॅक्सीतून (Ajit Pawar on Pune Coronavirus Ola driver) आले, त्या टॅक्सीचालकाला कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय पातळीवर सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. राज्याचं विधीमंडळ अधिवेशन सुरु आहे. त्यामध्ये आज याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

अजित पवार म्हणाले, “पुण्यातील एक दाम्पत्य दुबईहून मुंबईला आणि तिथून टॅक्सीने पुण्याला आले. त्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर, विभागीय आयुक्तांनी ते ज्या टॅक्सीने आल्या त्या ड्रायव्हरची चाचणी करण्यास सांगितलं. तो टॅक्सीचालक पुण्यातील मांजरी परिसरात राहणारा आहे. त्याची चाचणी केली असता तो सुद्धा पॉझिटिव्ह आला”.

जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर सर्व माहिती घेण्याचं काम सुरु आहे. या टॅक्सी ड्रायव्हरच्या गाडीत जे जे बसले, त्याच्याशी ज्यांचा संपर्क आला त्या 7 ते 8 जणांचीही चाचणी करण्यात आली आहे. त्यांना लागण झाली की नाही ते  तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचे अहवाल दुपारपर्यंत येतील. त्यांना जर लागण झाली असेल तर त्याची व्याप्ती आणखी वाढू शकते, मात्र घाबरण्याचे काम नाही, जनतेने काळजी घेण्याची गरज आहे, असं अजित पवार म्हणाले.

कोरोनाबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा होईल,  त्या 7 ते 8 जणांचे रिपोर्ट कसे येतात त्यावर सर्व अवलंबून आहे. मोठ्या प्रमाणात अफवा पसरविल्या जात आहेत. जर कोणाला आजार झाला तर घाबरुन जाण्याची गरज नाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, असं अजित पवार यांनी सांगितलं.

“आज काळजी घ्यायची गरज आहे, पुण्यात पाच जणांना करोनाची लागण झाल्यावर मुख्य म्हणजे ओला गाडीचा जो ड्राईव्हर होता त्याला लागण झाल्याने त्याच्या संपर्कामध्ये जे आठ लोकं आली होती, त्यांची तपासणी सुरू आहे. त्यांचा अहवाल दुपारी एक वाजता येण्याची शक्यता आहे त्यानंतर जर त्यामध्ये या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर तो भाग पुढे गंभीर होऊ शकतो. प्रत्येकाने काळजी घ्यायची गरज आहे. महत्वाची बैठक होत आहे या विषयी सविस्तर माहिती घेऊन त्या संदर्भात योग्य ते निर्णय घेतले जातील”- अजित पवार

बाळासाहेब थोरात

कोरोनाचे संकट राज्यात आले आहे, पण काळजी घेताना घाबरुन जाऊ नये, कामकाज सल्लागार समितीचीआज बैठक आहे, त्यात विषय होईल. राज्य सभेच्या चौथ्या जागेसाठी सुद्धा आज चर्चा होईल, महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वैगरे काही होणार नाही, आम्ही सरकार व्यवस्थित चालवू. महाराष्ट्रातील भाजप नेते स्वप्न पाहत आहेत, ते कधीच पूर्ण होणार नाही, असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

पुण्यात कोरोनाचा शिरकाव

दुबईहून आलेल्या पुणेकर दाम्पत्याला कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी तिघांनाही संसर्ग झाल्याचं उघड झालं. यामध्ये दाम्पत्याचीच कन्या, नातेवाईक आणि संबंधित कुटुंबाला मुंबईहून पुण्याहून घेऊन येणाऱ्या ओला कॅब चालकाचा समावेश आहे.

कोरोनाबाधित सर्व रुग्णांना पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर विलगीकरण कक्षात तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असून सौम्य स्वरुपाचा कोरोना असल्याची माहिती आहे.

आरोग्यमंत्र्यांचा सल्ला :

एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली, तरी ती बरी होऊ शकते. कोरोना 80 टक्के सौम्य स्वरुपाचा आहे. त्यानंतर 10 ते 15 टक्के गंभीर, तर 5 टक्के अतिगंभीर स्वरुपाचा असतो. यामध्ये 2 ते 5 टक्के मृत्यूदर आहे,” असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

सर्वांनी काळजी घ्या. चिकन-मटण खाऊ नये अशा ज्या अफवा पसरल्या आहेत. त्या धादांत खोट्या आहेत. चिकन मटण न खाल्ल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. तुम्हाला जे काही खायचं आहे ते व्यवस्थित शिजवून खाल्लं पाहिजे. विशिष्ट उच्च तापमानावर कोरोनाचे विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. कोरोना व्हायरसचा इन्क्यूबेशन पिरेड हा किमान 14 दिवसांपासून 28 दिवसांपर्यत इनक्यूबेशन असतो, असंही टोपेंनी स्पष्ट केलं होतं. (Corona Virus Prevention in Pune)

संबंधित बातम्या

Corona in Pune | पुण्यात गर्दीचे कार्यक्रम रद्द, अनेक शाळा बंद, रुग्णालयंही सज्ज

Corona Virus | महाराष्ट्रातही कोरोनाचा शिरकाव, कोरोनाला रोखण्यासाठी 10 सोपे उपाय

कोरोनाचा कहर, संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी सोहळा रद्द

अजित पवारांच्या कार्यक्रमापूर्वी औषध फवारणी, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आयोजकांची खबरदारी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.