कोरोनाचा कहर, संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी सोहळा रद्द

कोरोनाचा कहर, संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी सोहळा रद्द

संत एकनाथ महाराजांचा पैठण येथील नाथषष्ठी सोहळा रद्द करण्यात (Nath Shashthi cancelled due to Corona) आला आहे.

चेतन पाटील

|

Mar 10, 2020 | 4:49 PM

औरंगाबाद : कोरोनामुळे संत एकनाथ महाराजांचा पैठण येथील नाथषष्ठी सोहळा रद्द करण्यात (Nath Shashthi cancelled due to Corona) आला आहे. नाथषष्ठी हा वारकरी संप्रदायाचा मोठा सोहळा मानला जातो. जवळपास आठ ते दहा लाख भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत असतो (Nath Shashthi cancelled due to Corona). मात्र, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभीवर खबरदारी म्हणून हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.

नाथषष्ठी सोहळा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. संत एकनाथ महाराजांच्या स्मृती निमित्त हा सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून आठ ते दहा लाख भाविक येतात. हा सोहळा जवळपास पंधरा दिवस चालतो. या सोहळ्याला खूप मोठी गर्दी असते. मात्र, जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून गर्दीच्या ठिकानी जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : कोरोना व्हायरस कशाने होतो?

कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. तो प्रचंड वेगाने पसरत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याच कोरोनाचा धोका लक्षात घेता हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाथषष्ठी रद्द करण्याबाबतचं पत्र प्रशासनाने सर्व अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. त्यामुळे अगदी तीन ते चार दिवसांवर येऊन ठेपलेला नाथषष्ठीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे.

जगभरात कोरोनाचा कहर

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या आजारामुळे फक्त चीनमध्येच साडे तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे आणि याशिवाय जगभरात दीड लाखापेक्षा जास्त लोकांना या आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतातही पाच ते सात कोरोना व्हायरस बाधित आरोपी आढळले आहेत. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रातही पुण्यात दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काल रात्री (9 मार्च) समोर आली. या दोघी रुग्णांवर पुण्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा : पुण्यातील दोघांना कोरोनाची लागण, तातडीने उपचार सुरु

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें