दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांची चाचणी झाली, सहापैकी पाचजण निगेटीव्ह

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांची कोरोना चाचणी झाली आहे. कुटुंबातील सहा जणांची कोरोना टेस्ट झालीये. यापैकी पाच जण निगेटिव्ह आल्याची माहिती पालिकेने दिलीये. तर, एका नातेवाईकाच्या अहवालाची अजूनही प्रतीक्षा आहे. केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी ही  माहिती दिलीये. 

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांची चाचणी झाली, सहापैकी पाचजण निगेटीव्ह
संग्रहित छायाचित्र.

डोंबिवली : दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) डोंबिवलीत आलेल्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांची कोरोना चाचणी  झाली आहे. त्याच्या कुटुंबातील सहा जणांची कोरोना टेस्ट झालीये. यापैकी पाच जणांचा अगहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती पालिकेने दिलीये. तर, एका नातेवाईकाच्या अहवालाची अजूनही प्रतीक्षा आहे. केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी ही  माहिती दिलीये.

दक्षिण आफ्रिकेवरुन डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह

डोंबिवलीतही दक्षिण आफ्रिकेवरुन आलेला एक प्रवासी काल कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला होता. डोंबिवलीत केपटाऊन (Cape Town) शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार आहेत. डोंबिवलीत आढळून आलेल्या रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे का, हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.

सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याच्या कुटुंबाची तपासणी आज करण्यात आली आहे. त्याच्या कुटुंबातील सहा जणांची कोरोना टेस्ट झालीये. त्यापैकी पाच जणांचा अगहवाल ही निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळालाय. तर, एका नातेवाईकाच्या अहवालाची अजूनही प्रतीक्षा आहे. केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी याबाबतची माहिती दिलीये. 

‘लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावीच लागतील’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ओमिक्रॉन विषाणूबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला महत्वाचे आदेश दिले आहेत. कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसंच लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावीच लागतील. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देशही ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

संबंधित बातम्या :

Omicron Variant : महाराष्ट्रातही ‘ओमिक्रॉन’चा धोका? दक्षिण आफ्रिकेवरुन डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह!

Published On - 11:37 am, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI