VIDEO | पालघरजवळ कंटेनर पेटला, कोट्यवधींच्या तीन आलिशान कार जळून खाक

कोट्यवधी रुपयांची किंमत असलेल्या मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, व्हॉल्वो कंपनीच्या तीन महागड्या गाड्या जळून खाक झाल्या. (Palghar Container Fire Luxury Cars)

  • मोहम्मद हुसेन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर
  • Published On - 15:32 PM, 25 Feb 2021
VIDEO | पालघरजवळ कंटेनर पेटला, कोट्यवधींच्या तीन आलिशान कार जळून खाक
मुंबईहून दिल्लीला कंटेनरने कार नेल्या जात असताना अचानक आग लागली

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागली. यामध्ये कंटेनरमधील सर्व महागड्या गाड्या जळून खाक झाल्या. मनोर येथील चिल्लार फाट्याजवळ हा प्रकार घडला. मुंबईहून दिल्लीला कंटेनरने कार नेल्या जात असताना अचानक आग लागली. (Palghar Container catches Fire BMW Mercedes Volvo Luxury Cars charred)

पालघरजवळ कंटेनरमधून धूर

मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी कंटेनर निघाला होता. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर भागात कंटेनर चालकाला कंटेनरमधून धूर निघत असल्याचं लक्षात आलं. त्याने तत्परता दाखवत कंटेनर चिल्लार फाट्याजवळ सर्व्हिस रोडवर थांबवला. कंटेनर बाजूला उभा करुन पाहिलं असता कंटेनरमधील आलिशान गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं दिसलं.

कोट्यवधींच्या आलिशान कार जळून खाक

कोट्यवधी रुपयांची किंमत असलेल्या मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, व्हॉल्वो कंपनीच्या तीन महागड्या गाड्या जळून खाक झाल्या. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती दिली जात आहे. अग्निशमन दल वेळेत पोहोचू न शकल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आलं नाही.

अग्निशमन दल वेळेत न आल्याचा आरोप

आगीत कंटेनरमधील सर्व महागड्या कार जळाल्याचं चालकाने सांगितलं आहे. महामार्गाचा ठेका असलेल्या IRB कडे अग्निशमनाची व्यवस्था नसल्याने ही घटना वेळीच नियंत्रणात आणता आली नाही, असा आरोपही केला जात आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कोट्यवधी रुपये किमतीच्या आलिशान कार जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. (Palghar Container catches Fire BMW Mercedes Volvo Luxury Cars charred)

पाहा व्हिडीओ :

पालघरमध्ये कंटेनर पलटून पेटला

मनोर-वाडा महामार्गावर ब्रेक अचानक जाम झाल्यामुळे कंटेनर रस्त्यावर पलटी होऊन गेल्याच आठवड्यात अपघात झाला होता. त्यानंतर कंटेनरला भीषण आग लागली. अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु कंटेनर पूर्णपणे जळून खाक झाला.

ही घटना काल रात्री 12 वाजताच्या सुमारास हमरापूरजवळ करगाव पुलाजवळ घडली. घटनास्थळी फायर ब्रिगेड दाखल झाल्याने आग विझवण्यात आली, मात्र यामध्ये कंटेनर पूर्णपणे जळून खाक झाला. घटनास्थळी मनोर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.

संबंधित बातम्या :

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, आई-वडील-बहिणीचा मृत्यू, चिमुकला बचावला

जळगाव ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू, आभोळा गावावर शोककळा

(Palghar Container catches Fire BMW Mercedes Volvo Luxury Cars charred)