मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर क्वालिस कंटेनरला धडकली, तरुणाचा मृत्यू, चालक जखमी

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर रसायनी पोलीस स्टेशन हद्दीत पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. (Car Container Accident Express Way)

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर क्वालिस कंटेनरला धडकली, तरुणाचा मृत्यू, चालक जखमी
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर क्वालिस अपघात
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 12:23 PM

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाला प्राण गमवावे लागले. क्वालिस कार कंटेनरवर आदळल्याने हा अपघात घडला. गेल्या तीन दिवसात मुंबई पुणे द्रुतगति महामार्गावर झालेला हा दुसरा अपघात आहे. (Raigad Qualis Car Container Accident on Mumbai Pune Express Way kills one)

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर रसायनी पोलीस स्टेशन हद्दीत पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने क्वालिस कार समोरच्या कंटेनरवर आदळली. या अपघातात 30 वर्षीय राहुल दलाने याचा मृत्यू झाला, तर चालक सिद्धेश पटेल जखमी झाला आहे. दोघेही मुंबईतील अंधेरीचे रहिवासी आहेत.

तीन दिवसात दुसरा अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मंगळवारीच विचित्र अपघात झाला होता. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. टेम्पो, ट्रेलर, कारसह अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला होता.

पुण्याहून मुंबईकडे जाताना बोरघाट उतरताना फूडमॉलजवळ हा अपघात झाला होता. या अपघातातील दोन जखमींना अष्टविनायक (पनवेल) आणि अन्य दोघांना वाशी येथे मनपा रुग्णालयात आणि एकाला इतर रुग्णालयात हलवण्यात आले होते.

कसा घडला होता अपघात?

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरने मागून टेम्पोला धडक दिली. टेम्पो पलटी झाल्यावर मागून येणाऱ्या दोन कार टेम्पोला धडकल्या. या चारही गाड्यांवर पाठीमागून येणारा टेम्पो धडकल्याने अपघाताची भीषणता आणखी वाढली. या अपघाताचे दोन्ही कारचा चक्काचूर झाला होता.

या अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमावरुन परतताना हा अपघात झाला. तर अन्य दोन कार सोबत होत्या. परंतु, घाटात मुंबईकडे जाताना दोन कार पुढे निघून गेल्या आणि या दोन कारचा अपघात झाला. (Raigad Qualis Car Container Accident on Mumbai Pune Express Way kills one)

पालघरमध्ये कंटेनर पलटून पेटला

मनोर-वाडा महामार्गावर ब्रेक अचानक जाम झाल्यामुळे कंटेनर रस्त्यावर पलटी होऊन अपघात झाला. त्यानंतर कंटेनरला भीषण आग लागली. अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु कंटेनर पूर्णपणे जळून खाक झाला.

ही घटना काल रात्री 12 वाजताच्या सुमारास हमरापूरजवळ करगाव पुलाजवळ घडली. घटनास्थळी फायर ब्रिगेड दाखल झाल्याने आग विझवण्यात आली, मात्र यामध्ये कंटेनर पूर्णपणे जळून खाक झाला. घटनास्थळी मनोर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.

संबंधित बातम्या :

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, आई-वडील-बहिणीचा मृत्यू, चिमुकला बचावला

जळगाव ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू, आभोळा गावावर शोककळा

जळगावात पपयांचा ट्रक उलटून भीषण अपघात; 15 मजूर जागीच ठार

(Raigad Qualis Car Container Accident on Mumbai Pune Express Way kills one)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.