CCTV : मनसेवरचा राग काढला, भाजप नगरसेवकाचा मनसैनिकावर जीवघेणा हल्ला

पनवेल (रायगड) : मनसेवरील रागातून भाजपच्या नगरसेवकाने मनसैनिकावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला आहे. आठ ते दहा गुंड कार्यकर्ते सोबत घेऊन पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसैनिक प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. मनसैनिकावरील हल्ला सीसीटीव्हीत कैद झाल्याने भाजप नगरसेवकाचं क्रूरकृत्य उघड झालं आहे. विजय चिपळेकर हे […]

CCTV : मनसेवरचा राग काढला, भाजप नगरसेवकाचा मनसैनिकावर जीवघेणा हल्ला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

पनवेल (रायगड) : मनसेवरील रागातून भाजपच्या नगरसेवकाने मनसैनिकावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला आहे. आठ ते दहा गुंड कार्यकर्ते सोबत घेऊन पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसैनिक प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. मनसैनिकावरील हल्ला सीसीटीव्हीत कैद झाल्याने भाजप नगरसेवकाचं क्रूरकृत्य उघड झालं आहे.

विजय चिपळेकर हे पनवेल महानगर पालिकेतील कामोठे भागातील नगरसेवक आहेत. 29 एप्रिलला रात्री 12 वाजल्यानंतर विजय चिपळेकर यांनी मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यावेळी चिपळेकर यांच्यासोबत आठ ते दहा गुंड कार्यकर्ते होते.

या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे गुंड साथीदार फरार झाले आहेत. शिवाय गुन्हा नोंद होऊ नये यासाठी स्थानिक कामोठे पोलीस स्टेशनवर दबाव आणत आहेत.

“वैयक्तिक कारण पुढे करत मनसेवर असलेल्या रागामुळे भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. मतदान संपल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला केला आहे.”, अशी प्रतिक्रिया मनसे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष आणि प्रशांत जाधव यांचे भाऊ महेश जाधव यांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.