‘तुतारी’ची पिपाणी वाजणार? आता या नवीन पक्षामुळे शरद पवार गटाच्या डोक्याला ताप

Maharashatra Vidhansabha Election 2024 : पक्षीय चिन्हांची खास गंमत असते. या चिन्हांमुळे संभ्रम झाल्यास भल्या भल्या उमेदवारांना पराभावाचा झटका बसतो. तर पक्षाला मोठा खड्डा पडतो. लोकसभेत तुतारीला पिपाणीने आस्मान दाखवले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाला काही जागांवर नुकसान सहन करावे लागले होते.

'तुतारी'ची पिपाणी वाजणार? आता या नवीन पक्षामुळे शरद पवार गटाच्या डोक्याला ताप
तुतारीसमोर पिपाणीचे आव्हान
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 10:06 AM

पक्षाचा वारसा सांगणारे चिन्हच ताप होऊ शकते हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले. शरद पवार गटाविरोधात या चिन्हाने निर्णायक कामगिरी बजावली. दोन निवडणूक चिन्हातील काही साम्यामुळे उमेदवारांना फटका बसला. मतांच्या काही फरकाने उमेदवार पडला. तुतारीसमोर लोकसभेत पिपाणी चिन्हाने मोठे आव्हान उभं केलं. त्याविरोधात शरद पवार गटाने आगपाखड केली. तरीही विधानसभेत या चिन्हाचा ताप पक्षाच्या डोक्याला राहणार आहे. आता या नवीन पक्षामुळे सुद्धा शरद पवार गटाला विधानसभेत सजग राहावे लागणार आहे.

निवडणूक आयोगाने विनंती केली अमान्य

लोकसभा निवडणुकीला तुतारीसमोर पिपाणीने मोठे आव्हान उभं केलं होते. त्याचा फटका काही मतदारसंघात दिसून आला. उमेदवार पडण्यामागे पिपाणीच कारणीभूत असल्याचे लक्षात आल्यावर शरद पवार गटाने हे चिन्ह गोठवण्यासाठी, पिपाणी चिन्ह हटवण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला केली होती. आयोगाने ही विनंती अमान्य केली. तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी हे चिन्हं वेगळं दिसतं. हा फरक मतदारांच्या सहज लक्षात येण्याजोगा असल्याचा दावा आयोगाने केला आहे. त्यामुळे लोकसभेसारखाच विधानसभेला फटका बसू नये यासाठी शरद पवार गटाला त्या त्या विधानसभा मतदारसंघात विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

या मतदारसंघात पिपाणीला पसंती

लोकसभा मतदारसंघात पिपाणीचा तुतारीला फटका बसल्याचे समोर आले. चिन्ह साधर्म्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला. अनेक मतदारांनी तुतारी ऐवजी पिपाणीला भरभरून मतदान केले, ते संभ्रमामुळे केल्याचा दावा शरद पवार गटाने केला. शिरूर, बारामती, सातारा, भिवंडी, दिंडोरी, रावेर, अहिल्यानगर, बीड या मतदारसंघात पिपाणीला पसंती मिळाल्याचे दिसून आले.

या पक्षामुळे झाला ताप

आता न्यू राष्ट्रीय समाज पक्ष पिपाणी घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. सरचिटणीस रामचंद्र घुटुकडे यांनी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. आपल्या सर्व उमेदवारांसाठी पिपाणी हे चिन्ह न्यू राष्ट्रीय समाज पक्ष घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शरद पवार गटासह महादेव जानकर यांच्याही अडचणी वाढणार असल्याचे दिसते. न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा ही राष्ट्रीय समाज पक्षासारखाच असल्याने महादेव जानकर यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. पिपाणी चिन्हाचा आग्रह धरला जाणार असल्याने लोकसभेनंतर विधानसभेलाही शरद पवार गटाला पिपाणी पुन्हा अडचणीत आणणार असल्याची चर्चा आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.